Christmas Tree Importance (Photo Credits: PixaBay)

क्रिसमस (Christmas) सण हा ख्रिस्ती बांधवांसाठी वर्षातील फार महत्त्वाचा सण मानला जातो. या सणासाठी अनेक महिन्यांपासून त्यांची तयारी सुरु असते. या सणात सांताक्लॉज (Santa Claus) प्रमाणे आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे 'क्रिसमस ट्री' (Christmas Tree). ही क्रिसमस ट्री सजविण्यासाठी लहान मुलांपासून थोरा-मोठ्यांपर्यंत विशेष उत्साह दिसतो. लहान मुलांना या ट्री चे फार आकर्षण असते. त्यामुळे त्यांच्या आग्रहास्तव अनेक जण घरात देखील छान क्रिसमस ट्री सजवतात. अशा वेळी दरवर्षी या क्रिसमस ट्री मध्ये काय वेगळंपण करावे असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. हे सगळं असले तरी नाताळ या क्रिसमसला ट्री ला एवढं महत्व का असते असे विचारल्यास प्रत्येकाला यामागचे कारण माहितीच असेल असे नाही.

या क्रिसमस ट्रीकडे पाहिले की सर्वात आधी प्रश्न पडतो की हे झाडं नेमकं आहे तरी काय? या झाला सूचिपर्णी वृक्ष असे म्हणतात. हा पगान संस्कृतीचा वृक्षपूजेचा एक भाग मानला जातो. त्याचा संबंध हिवाळ्यातील संक्रमणाशी आहे. क्रिसमस ट्री हे नाव प्रथम इ.स.1835 मध्ये उदयास आले. हे वृक्ष दिव्यांच्या माळा आणि अन्य सजावट साहित्यांनी सुशोभित केले जातात. लहान मुलांचे मोजे, छोट्या प्रतीकात्मक काठ्या, छोट्या घंटा, भेटवस्तू अशा गोष्टी लावून हा वृक्ष सजवितात.हेदेखील वाचा- यावर्षी Christmas आणि New Year साजरा करता येणार नाही? लवकरच मुंबई महापालिका जाहीर करणार नवी नियमावली

क्रिसमस ट्री परंपरा कशी उदयास आली?

क्रिसमस ट्री ची परंपरा जर्मन लोकांनी सुरू केली असे मानतात. 16 व्या शतकातील संत मार्टिन ल्युथर हे पहिले व्यक्ति होते ज्यांनी आपल्या घरात क्रिसमस ट्री सजवला होता. पूर्वीच्या काळी ओक झाड क्रिसमस ट्री म्हणून सजवायचे. परंतु कालानुरूप क्रिसमस ट्री चे स्वरूप बदलत गेले आणि आता प्लास्टिक आणि विविध स्वरुपात क्रिसमस ट्री उपलब्ध होतो.

तर हे आहे क्रिसमस ट्री सजविण्यामागचे मूळ कारण... हे सांगण्यामागचे मूळ उद्देश्य हाच की आपल्याला व आपल्या पुढच्या पिढीला एखाद्या सणाला कोणती विशेष गोष्ट का आणि कशासाठी करतात हे माहित व्हावे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर कळवा.