Mauni Amavasya 2020: हिंदू कालदर्शिकेतील माघ महिन्यातील कृष्णपक्षाला येणाऱ्या अमावस्येला माघी किंवा मौनी अमावस्या असे म्हणतात. या तिथीवर अनेक भाविक प्रयागराज (Prayagraj) येथे आयोजित केल्या जाणाऱ्या माघ मेळ्यात सहभागी होतात, याठिकाणी पवित्र स्नान केल्यास पापक्षालन होते असे मानतात. यानुसार आज, 24 जानेवारी गंगा- यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमात (Triveni Sangam) स्नान करण्यासाठी अनेक भाविक प्रयागराज येथे रवाना झाले आहेत. असं म्हणतात, की मौनी अमावास्येच्या तिथीवर आपल्या पूर्वजांना तर्पण (Tarpan) दान केले जाते, यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, तसेच आपल्या ऐपतीनुसार जितके शक्य होईल तितके दान केल्याने पाप धुतले जाते, या साऱ्याने जर का तुमचे वाईट दिवस सुरु असतील किंवा शनी दोष, कालसर्प दोष इत्यादी त्रास तुमच्या यशात अडथळा ठरत असतील तर त्यावर तात्काळ उपाय होतो. खरंतर यामध्ये अनेक श्रद्धेच्या बाबी आहेत मात्र स्वतःसाठी उत्तम घडावे आणि त्यातून कोणाला तरी फायदा व्हावा या हेतूने तुम्ही या पाच गोष्टी नक्की करून पाहू शकता. Shani Rashi Parivartan 2020: मौनी अमावस्या दिनी आज होणार शनीचे संक्रमण; पहा कोणत्या राशीवर काय परिणाम होणार?
मौनी अमावस्या तिथी
अमावस्या प्रारंभः 24 जानेवारी 2020 को सकाळी 02 वाजून 17 मिनिट ते
अमावस्या समाप्ती - 25 जानेवारी 2020 सकाळी 03.11 मिनिटांपर्यंत
मौनी अमावास्येच्या दिवशी काय केल्याने होतो लाभ?
- कालसर्प दोषातून मुक्तिसाठी यादिवशी मुंग्यांना अन्नदान करावे, एका मळलेल्या पिठाच्या गोळ्यात थोडी साखर टाकून मुंग्यांना खाता येईल अशा ठिकाणी ठेवावे. या भूतदयेने तुम्हाला सुद्धा लाभ होईल.
-मुक्या प्राण्याची सेवा करण्याची मौनी अमावस्या ही एक संधी आहे, या दिवशी मळलेल्या पिठात थोडे काळे तीळ आणि तूप घालून त्याची पोळी बनवावी ही पोळी कुत्रा आणि गायीला किंवा कोणत्याही चार पायांच्या प्राण्याला खाऊ घालावी.
- यादिवशी घरात तांदुळाहसिल खीर बनवून लक्ष्मी देवी आणि शंकर भगवान यांना नैवैद्य दाखवावा आणि मग कुटुंबासह भोजन करावे. सर्वानी केत्र बसून जेवल्याने आर का कौटुंबिक वाद सोडवण्यात सहजता येईल.
- ही अमावस्या थंडीच्या दिवसात येत असल्याने शरीरासाठी उत्तम उष्णता देणारे काळे तिल, काळे उडीद , काळे कपडे दान करावेत .
- यंदा मौनी अमावस्या हि शनी परिवर्तन दिनाच्या तिथी सोबतच आली आहे, त्यामुळे शनी देवाची पूजा करून घराबाहेर पिठाचा दिवा लावावा.
दरम्यान, आज मौनी अमावास्येच्या (Mauni Amavasya) तिथीवर शनी ग्रहाचे (Shani) मकर (Makar) राशींमध्ये संक्रमण होणार आहे. तब्बल 150 वर्षानंतर शनी संक्रमणाचा हा योग्य मौनी अमावास्येच्या तिथीवर जुळून आला आहे.
(टीप: हा लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यातुन लेटेस्टली मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवु इच्छित नाही.)