Mangalagaur 2020 Images: मंगळागौर निमित्त Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून साजरा करा श्रावणमास
Mangalagaur 2020 Images (Photo Credits-File Image)

Mangalagaur 2020 Images: हिंदू परंपरेनुसार श्रावण महिना हा फार महत्वाचा मानला जातो. तर श्रावण महिन्यात विविध व्रतवैकल्य सुद्धा पार पाडली जातात. याच काळातील एक महत्वाचे व्रत म्हणजे मंगळागौर. श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिला लग्नानंतर पुढील पाच वर्ष हे व्रत करते. हे व्रत शिव आणि पार्वतीचे आदर्श गृहस्थाश्रमाचे उत्तम उदाहरण मानले जाते. मंगळागौर या दिवशी नववधू साज श्रृंगार करुन पूजा करतात. तर ही पूजा सामूहिकरित्या खासकरुन पार पाडली जाते.(Mangalagaur 2020 Date: नवविवाहितांसाठी आनंदाची पर्वणी असणारी मंगळागौर यंदा कधी साजरी कराल? जाणून घ्या पूजेचे महत्त्व आणि विधी)

मंगळागौरची आणखी एक मुख्य खासियत म्हणजे महिलांमध्ये याचा फार आनंद दिसून येतो. महिला रात्रभर मंगळागौर जागवतात. तसेच मंगळागौर निमित्त वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा अशा सारखे खेळ खेळले जातात. तर यंदाच्या मंगळागौर निमित्त Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून साजरा करा श्रावणमास.(Shravan Month 2020 in Maharashtra:महाराष्ट्रात श्रावण महिना 21 जुलै पासून; श्रावणी सोमवार, मंगळागौर ते महत्त्वाच्या सणांच्या पहा तारखा)

Mangalagaur 2020 Images (Photo Credits-File Image)
Mangalagaur 2020 Images (Photo Credits-File Image)
Mangalagaur 2020 Images (Photo Credits-File Image)
Mangalagaur 2020 Images (Photo Credits-File Image)
Mangalagaur 2020 Images (Photo Credits-File Image)

 

मंगळागौर ही एक सौभाग्यदेवता असल्याचे मानले जाते. आपल्या पतीच्या रक्षणासाठी, भल्यासाठी श्रावणातील मंगळवारी हे व्रत नित्यनियमाने ठेवतात. त्यापैकी पहिला व शेवटचा मंगळवार अधिक महत्व असते. या वारी पूजा केली म्हणजे जन्माचे सार्थक झाले असा समज आहे.तसेच या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात इतर स्वयंपाक सणाप्रमाणे करतात.