श्रावण (Shrvan Maas) महिना म्हटला की सण-समारंभ, व्रत वैकल्यांची रेलचेल ही असतेच. यंदा 29 जुलै पासून श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असलेल्या श्रावण महिन्यामध्ये दर मंगळवारी मंगळागौर पूजनाचा घाट घातला जातो. नवविवाहितांसाठी मंगळागौरीचं (Mangala Gauri) विशेष आकर्षण असतं. लग्नानंतर 5 वर्ष ही मंगळगौर खेळण्याची प्रथा असते. या निमित्ताने सार्या महिला एकत्र जमतात आणि रात्र जागवतात. रात्र जागवून खेळ खेळण्याची प्रथा आहे. मग यंदा मंगळागौरी पूजनाचे (Mangala Gauri Puja) कोणते दिवस आहेत हे नक्की जाणून घ्या.
मंगळागौर पूजन 2022 तारखा
श्रावण महिन्यात यंदा पहिली मंगळागौर पूजा 2 ऑगस्ट दिवशी होणार आहे. त्यानंतर 9,16,23 ऑगस्ट दिवशी मंगळागौर पूजन केले जाणार आहे. हे देखील नक्की वाचा: Shravan Month 2022 in Maharashtra: महाराष्ट्रात श्रावणमासारंभ 29 जुलै पासून; श्रावणी सोमवार व्रत, मंगळागौर सह या पवित्र महिन्यातील सण, व्रतांच्या जाणून घ्या तारखा .
कशी करतात मंगळागौर पूजा ?
मंगळागौर पूजनावेळी नात्यातील, शेजारील, ओळखीच्या स्त्रियांना, मुलींना बोलावून पूजा करण्याची, फुगडी, बसफुगडी, झिम्मा असे विविध पारंपारिक खेळ खेळण्याची प्रथा आहे. नक्की वाचा: Shravani Somvar 2022 Dates: महाराष्ट्रात श्रावणी सोमवार व्रत यंदा 1 ऑगस्टपासून; जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणती शिवमूठ?
प्रेम नवविवाहितेच्या वैवाहिक जीवनात निर्माण व्हावे, अखंड सौभाग्य आणि सुखसमृद्धी लाभावी, म्हणून मंगळागौरीचे व्रत करण्याची प्रथा आहे. लग्नानंतर आईने मुलीला दिलेले 'सौभाग्य व्रत' म्हणून मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे.