Holi 2022 Organic Colours: यंदा शुक्रवारी म्हणजेचं 18 मार्च रोजी होळी आहे. होळीला रंगांचा सण म्हणतात. तो रंगांशिवाय अपूर्ण आहे. मात्र बाजारात मिळणारे रंग वापरण्यास लोक घाबरतात. कारण त्यात रसायनांचा वापर केला जातो. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल तर तुम्ही घरी राहून नैसर्गिकरित्या होळीचे रंग बनवू शकता आणि या रंगाच्या साहाय्याने होळी खेळू शकता. आज आम्ही तुम्हाला घरातील काही वस्तूंचा वापर करून नैसर्गिक रंग कसे बनवायचे ते सांगणार आहोत. चला तर मग नैसर्गिक रंग बनवण्याची पद्धती जाणून घेऊयात...
'या' पद्धतीने बनवा नैसर्गिक रंग -
पिवळा रंग -
घरी नैसर्गिकरित्या पिवळा रंग करण्यासाठी हळदीचा वापर करा. झेंडूच्या फुलाला हळद कुटून त्यात पाणी घालून मिश्रण तयार करा. आता याचा वापर करून तुम्ही होळीच्या दिवशी एकमेकांना रंग लावू शकता. याशिवाय बेसन आणि हळद दोन्ही वापरू शकता. एक वाटी बेसन आणि अर्धी वाटी हळद एकत्र करून तुम्ही रंग खेळू शकता.
लाल रंग -
नैसर्गिकरित्या लाल रंग येण्यासाठी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या आणि चंदन बारीक करून गुलाल बनवू शकता. याशिवाय जर तुम्हाला लिक्विड मिश्रण बनवायचे असेल तर डाळिंब, गाजर आणि टोमॅटो बीटरूट बरोबर बारीक करून घ्या आणि तयार मिश्रणाने होळी खेळा.
केशरी रंग -
केशरी रंगाचा गुलाल बनवण्यासाठी तुमच्याकडे चंदन पावडर आणि पळसाची फुले असणे आवश्यक आहे. दोन्ही समान प्रमाणात बारीक करून तुम्ही गुलाल बनवू शकता. दुसरीकडे, द्रव मिश्रण तयार करण्यासाठी, आपण पळसाची फुले पाण्यात बारीक करून वापरू शकता.
निळा रंग -
जर तुम्हाला निळा रंग बनवायचा असेल तर तुम्ही जास्वंदाची फुले पाण्यात बारीक करून या मिश्रणाने तुम्ही होळी खेळू शकता. तसेच निळ्या रंगाचा गुलाल बनवण्यासाठी, तुम्ही जास्वंदाचे फूल सुकवून ते बारीक करून गुलाल म्हणून वापरू शकता.