
हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती 'महाराष्ट्रात कृषी दिन' (1 जुलै) म्हणून साजरी केली जाते. तर भारत हा कृषिप्रधान देश तर आहेच, पण महाराष्ट्राला देखील कृषिप्रधान असे समजले जाते. महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या शेतात काबाडकष्ट करुन सर्वांचे पोट भरतो. जगाचा पोशिंदा म्हणवणाऱ्या शेतकऱ्याचा कृषी दिनानिमित्त गौरव करण्यात येतो. तसेच शेती विषयक विविध कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात येते. परंतु सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार नाही आहे. परंतु राज्य सरकारकडून शेतकरी बांधवांसाठी विविध योजनांची घोषणा केली जाऊ शकते.
सद्यस्थितीला दुष्काळ, अतिवृष्टी, वातावरणातील बदल, दिवसेंदिवस घटत चालेली पाणी पातळी आणि सरकाची शेतीविषयी असलेली आनास्था ही आजच्या शेतीपुढली मोठी आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना करतच येथील शेतकरी देशाला कृषी प्रधान करत आहे. समोर कितीही मोठे प्रश्न असले तरी बळीराजा वर्षभरातील सण उत्सव आणि विविध दिवस साजरे करत असतो. तर यंदाच्या महाराष्ट्र कृषी दिनाच्या मराठमोळ्या Wishes, Greetings, Images, Whatsapp Status, Facebook च्या माध्यमातून बळीराजाला द्या शुभेच्छा!(राष्ट्रीय शेतकरी दिन नेमका का साजरा केला जातो? जाणून घ्या)
>>इडा पीडा टळो आणि बळी राजाचे राज्य येवो
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

>>अस्मानी सुलतानी संकटे
झेलीत विश्वाचे पोट भरणाऱ्या बळीराजाला
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

>>'शेतकरी जगला तर तुम्ही, आम्ही आणि देश जगेल''
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

>>शेतात घाम गाळून सोनं पिकवणाऱ्या बळीराजाला
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

>>घाम गाळून काळ्या मातीत पिकवतो
मोती जगाचा पोशिंदा स्वत:ला म्हणवितो
महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

वसंत नाईक हे महाराष्ट्राचे तिसरे आणि सर्वाधिक मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले मुख्यमंत्री आहेत. 1963-75 या काळात ते मुख्यमंत्रीपदी होते. दरम्यान शेतकर्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वसंत नाईक यांचा मोठा मोलाचा वाटा आहे.