Vasantrao Naik Jayanti 2019: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांचा जन्मदिन (1 जुलै) 'महाराष्ट्र कृषी दिन' (Maharashtra Krishi Din) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे, त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो. आजही महाराष्ट्रात शेतकर्यांची स्थिती बिकट आहे. देशाचा अन्नदाता असणार्या शेतकर्यावर बिकट संकट असल्याने अनेकजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र आजच्या 'कृषी दिना'पासून प्रत्येकाने शेतकर्याप्रती आपलं असलेले सामाजिक भान लक्षात घेता बिकट काळात शेतकर्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ देणं गरजेचे आहे. म्हणूनच राज्यातील शेतकर्याला 'महाराष्ट्र कृषी दिना'च्या शुभेच्छा देण्यासाठी ही खास शुभेच्छापत्र आणि मेसेजेस!
कृषी दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रिटिंग्स
वसंत नाईक हे महाराष्ट्राचे तिसरे आणि सर्वाधिक मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले मुख्यमंत्री आहेत. 1963-75 या काळात ते मुख्यमंत्रीपदी होते. दरम्यान शेतकर्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वसंत नाईक यांचा मोठा मोलाचा वाटा आहे.