
1 मे दिवशी यंदा राज्यात 66 वा महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) साजरा केला जाणार आहे. 1 मे 1960 दिवशी मराठी भाषिकांना मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र हे राज्य मिळाले. त्यामुळे मोठं आंदोलन उभारून मराठी बांधवांनी मिळवलेल्या अखंड महाराष्ट्राबद्दल अभिमान व्यक्त करण्याचा हा आनंदाचा दिवस आहे. 1 मे हा आनंदाचा, जल्लोषाचा सण असला तरीही 107 हुतात्म्यांच्या बलिदानाचं देखील या दिवशी स्मरण करत त्यांना आदरांजली अर्पण केली जाते. मग यंदाच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईक, प्रियजण, मित्रमंडळींना देत महाराष्ट्र दिन मोठ्या जल्लोषात साजरा करा. WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, Wishes, Greetings द्वारा तुम्ही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा शेअर करू शकता.
महाराष्ट्र हा मराठी जनांचा प्रदेश आहे. मराठी ही महाराष्ट्राची प्रादेशिक भाषा आहे. भाषावार Greetings प्रांतरचनेनुसार मुंबई सह महाराष्ट्र मराठी बांधवांना आणि गुजराती भाषिकांना गुजरात हा प्रदेश देण्यात आला. पूर्वी ही दोन्ही राज्यं मिळू ब्रिटीश काळात बॉम्बे प्रेसेडंसी होती. मात्र भाषावार प्रांतरचनेत त्याचे विभाजन झाले आहे. Maharashtra Din Wishes 2025: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत मराठी बांधवांसोबत आनंद करा द्विगुणित .
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा





महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत अनेक ठिकाणी सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे. त्यामुळे येथील शौर्यकथांचे कथन करून पुढील पिढीला गौरवशाली महाराष्ट्राची महती सांगितली जाते. राज्यात 1 मे दिवशी शासकीय सुट्टी साजरी असते.