
राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ नुसार भाषांवार देशात राज्याची निर्मिती झाली आणि मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्त्वामध्ये आला. 1 मे 1960 दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून 1 मे दिवशी महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) साजरा करण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात खाद्यसंस्कृती पासून निसर्ग सौंदर्यामध्ये वैविध्य आहे. ठराविक अंतरावर राज्यात बोलीभाषेमध्येही बदल होतात. मग अशा विविधतेने नटलेल्या महाराष्ट्राबदद्ल गौरव बाळगत तुमच्या मराठी बांधवांना यंदाच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत हा दिवस अजून थोडा खास बनवण्यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली शुभेच्छापत्र, Greetings, WhatsApp Status, Messages, Wishes, Quotes, SMS च्या माध्यमातून शेअर करत हा दिवस जल्लोषात साजरा करा.
1 मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी राज्यात शासकीय सुट्टी असते. महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ 1 मे दिवशी राज्याच्या विविध भागात अनेक सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम साजरे केले जातात. नक्की वाचा: स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये या '107' हुतात्मांनी दिले होते बलिदान!
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा






महाराष्ट्र दिन हा मराठी परंपरेचा वारसा जपणारा एक महत्त्वाचा दिवस आहे. दरम्यान हा दिवस आनंदाचा असला तरीही मोठ्या संघर्षाने मराठी माणसांनी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र मिळवला आहे त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधून संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुताम्यांचं देखील या दिवशी स्मरण केले जाते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारल्याने मराठी माणसांमध्ये संतापाचे वातावरण होते.मराठी माणसांनी मोठे आंदोलन उभारल्याने सरकारने नमती बाजू घेत मुंबई सह महाराष्ट्राची निर्मिती केली आहे.