
Maharashtra Day 2023 Quotes: महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून दरवर्षी ‘महाराष्ट्र दिन’ (Maharashtra Din 2023) साजरा केला जातो. मराठी भाषकांच्या स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली, त्यामुळे 1 मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ साजरा होतो. या दिवशी राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सरकारतर्फेही मोठ्या उत्साहात हा दिवसा साजरा होतो. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरणही या दिवशी केले जाते.
राज्य पुनर्गठन अधिनियम, 1956 ने भाषेच्या आधारावर भारतातील राज्यांसाठी असलेल्या सीमा निश्चित केल्या. परंतु 1956 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंनी 5 वर्षांसाठी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. नंतर लोकसभेने द्विभाषिक बॉम्बे (मुंबई) राज्याचा ठराव मंजूर केला. मार्च 1960 मध्ये लोकसभेने राज्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर एका महिन्यानंतर कनिष्ठ सभागृहाने मुंबई राज्याचा ठराव मंजूर केला व 1 मे 1960 रोजी मुंबई राजधानीसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
तर महाराष्ट्र दिनी खास Images, Whatsapp Status, Wishes, Quotes, Greetings, Messages द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा महाराष्ट्र निर्मितीचा दिवस.





दरम्यान, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन केले. मुंबईच्या फ्लोरा फाऊंटन येथे संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 105 जणांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली. पुढे 1 मे 1960 रोजी महाराष्तर राज्य अस्तित्वात आले आणि पंडितजींनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना नवीन महाराष्ट्राचे नेतृत्व सोपवले. (हेही वाचा: यंदा 1 आणि 2 जून 2023 रोजी रायगडावर साजरा होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा; विविध कार्यक्रमांचे आयोजन, जाणून घ्या कशी असेल तयारी)
आज जवळजवळ 63 वर्षानंतर साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाटक, चित्रपट, संगीत, सहकार्य, शेती, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्राने आतापर्यंत उत्तम प्रगती केली आहे.