Lokmanya Tilak Marathi Quotes: बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील चिखलगाव येथे झाला. त्यांचे पाळण्यातील नाव केशव असे होते. पण पुढे बाळ असे रुढ झाले. स्वातंत्र्यसेनानी, उत्तम वक्ते, पत्रकार, तत्त्वज्ञ, पुढारी असलेल्या टिळकांवर लोकांनी प्रचंड प्रेम केले म्हणून त्यांना लोकमान्य ही उपाधी मिळाली आणि ते लोकमान्य टिळक म्हणून ओळखले जावू लागले. यंदा त्यांची 165 वी जयंती आहे. त्यांच्या जयंती निमित्त त्यांचे विचार फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) द्वारे शेअर करुन त्यांना उजाळा देऊया.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांचे प्रसिद्ध उदगार सर्वश्रूत आहे. इंग्रजाविरुद्धच्या लढ्यातील ही त्यांची सिंहगर्जना आजही स्मरली जाते. त्यांच्या असंख्य आठवणीतील हा एक ठेवाच म्हणावा लागेल. टिळक आपल्याला अनेक थोर विचारांचा वारसा देऊन गेले आहेत.
लोकमान्य टिळक विचार:
टिळकांना उत्तम स्मरणशक्ती लाभली होती. मात्र आरोग्य त्यांनी व्यायामाने कमावले. स्वातंत्र्यासाठी आग्रही असलेल्या टिळकांनी न्यु इंग्लिश स्कुल शाळा आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. लोकांपर्यंत आपले विचार पोहचवण्यासाठी मराठा आणि केसरी ही वृत्तपत्रं काढली. त्याचबरोबर लोकांमध्ये एकी निर्माण व्हावी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. तसंच जनमाणसांत स्वातंत्र्याची इच्छा जागृत व्हावी म्हणून शिवजयंतीचा उत्सव सुरु केला.