Lakshmi Pujan 2020 Wishes: दिवाळीच्या सणामध्ये लक्ष्मीपूजनाला अत्यंत महत्त्व आहे. महाराष्ट्रात दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan) करण्याची प्रथा आहे. दरवर्षी आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी लक्ष्मीपूजन केलं जातं. यंदा 14 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन केलं जाणार आहे. या दिवशी लक्ष्मी मातेच्या मूर्तीची पूजा केली जाते. लक्ष्मीमातेसमोर घरातील सर्व धन, पैसे, दागिने ठेवून पूजा मांडली जाते. लक्ष्मी मातेसमोर दिवे लावले जातात. त्यानंतर देवीला पूरणपोळीचा नैवैद्य दाखवून घरातील सर्वजण लक्ष्मीमातेचे दर्शन घेतात. या दिवशी घरातील लहान मुलं ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतात.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करतात. देशात प्रत्येक घरात लक्ष्मीपूजनाचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी पाटावर झाडूला लक्ष्मी मानून तिची पूजा करण्याची परंपरा आहे. शास्त्रात झाड़ूला लक्ष्मीचे रूप मानण्यात येते. त्यामुळे या दिवशी झाडूची लक्ष्मीस्वरुपात पूजा केली जाते. यंदा दिवाळीच्या सणावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे यावर्षी सर्वांनाचं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत दिवाळीचा सण साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे यंदा तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष्मीपूजनाच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील मेसेज नक्की उपयोगी ठरतील. (हेही वाचा - Diwali 2020 Diet Tips: दिवाळीत चकली, लाडू यांसारख्या फराळामध्ये यंदा करा 'हे' महत्त्वाचे बदल आणि घ्या आपल्या डाएटची काळजी)
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
तुम्हाला दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे लक्ष्मी माते तू ये कुंकवाच्या पावलांनी,
नाव तुझं जपतो सदैव मनी,
मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार,
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश,
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास!
तुम्हाला दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज लक्ष्मीपुजन!
तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,
शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो...
लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. पौराणिक साहित्यात लक्ष्मी ही विष्णूची पत्नी मानली गेली आहे. पौराणिक कथेनुसार, आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी लक्ष्मीला वास्तव्य करणे आवडते.