Krishna Janmashtami 2024 Wishes in Marathi: भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2024) ही भगवान श्रीकृष्णाची जयंती (Shri Krishna Jayanti) म्हणून साजरी केली जाते. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केली जाते. या दिवशी उपवास करण्याची परंपरा आहे. भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्ण अवतरले होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
वैदिक दिनदर्शिकेनुसार, यावर्षी भाद्रपद कृष्ण अष्टमी तिथी 26 ऑगस्टला पहाटे 3:39 वाजता सुरू होणार आहे आणि 27 ऑगस्टला पहाटे 2:19 वाजता संपणार आहे. सोमवार, 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी होणार आहे. देशभरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी लोक एकमेकांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील सोशल मीडीयात व्हॉट्सअॅप स्टेटस, स्टिकर्स, फेसबूक मेसेजेस, Wishes, GIFs द्वारा कृष्ण जन्माष्टमी मराठमोळ्या शुभेच्छा आपल्या मित्र-परिवारास पाठवू शकता. यासाठी तुम्ही लेटेस्टली मराठीने तयार केलेले खास ग्रेटिंग डाऊनलोड करू शकता. (Janmashtami 2024: कृष्ण जन्माष्टमीनिमित झटपट बनवा बाळकृष्णाचा आकर्षक पाळणा, पाहा व्हिडीओ)
कृष्ण मुरारी नटखट भारी
माखनचोर जन्मला
रोहिनी नक्षत्राला
देवकी नंदाघरी
बाळ तान्हे तेजस्वी
मोहूनी घेती
सर्व मिळूनी पाळणा गाती
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
गोकुळात होता ज्याचा वास,
गोपिकांसोबत ज्याने रसला रास,
यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता,
तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,
राम नारायणं जानकी वल्लभं,
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद
लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास
असा आहे आजचा दिवस खास
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा
दही-दूध-लोणी आहे ज्याचा छंद,
तो आमचा लाडका श्रीकृष्ण ,
सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भक्त दिवसभर उपवास करतात. या दिवशी श्रीकृष्णाला हळद, दही, तूप, तेल, गंगाजल इत्यादींनी स्नान करून चंदन लावले जाते. या दिवशी कृष्णाच्या मंदिरांमध्ये भव्य सजावट केली जाते. भजन, कीर्तन केले जाते. या दिवशी श्रीमद भागवताचे पठणही केले जाते.