Janmashtami 2024: जन्माष्टमी किंवा कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी ही श्रावण किंवा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी केली जाते. या वर्षी, जन्माष्टमी 26 ऑगस्ट रोजी आणि 27 ऑगस्ट रोजी दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. भगवान विष्णूचा आठवा अवतार, भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म साजरा करणारा हा हिंदू सणांपैकी एक आहे. हीच ती वेळ आहे जेव्हा संपूर्ण भारतातील लोक बाल गोपाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णाच्या जन्माष्टमीसाठी झुला सजवून भगवान कृष्णाचा जन्म साजरा करतात. रास लीला, दहीहंडी स्पर्धा आणि भगवान कृष्णाचे जीवन आणि कृष्ण लीला यांचे चित्रण करणारे विशेष कार्यक्रम या उत्सवात साजरा केले जातात. कृष्ण जन्माष्टमी मथुरा, द्वारका आणि भारतातील इतर ठिकाणी श्री कृष्णाचा जन्म, जीवन इतिहास आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांशी निगडीत संपूर्ण गोष्टी उत्साहात साजरी केली जाते. बालगोपाल मूर्ती झुल्यात ठेवली जाते आणि त्यांना मखमली कपडे घालून सजवले जाते आणि बाजूला दोन लहान कुशन ठेवल्या जातात. तर, जर तुम्ही भगवान श्रीकृष्णाचा जन्म त्याच्या बालस्वरूप आणि झुल्याच्या सजावटीसाठी झुला कसा सजवायचा हे पाहात असाल तर तुम्ही खाली दिलेले व्हिडीओ पाहून झुला सजवू शकता. येथे काही ट्यूटोरियल आहेत जे तुम्हाला काही सोप्या गोष्टी करून झुला कसा सजवायचा याबद्दल मार्गदर्शन करू शकता. तुम्हीला ज्या ठिकाणी झुला बनवायचा किंवा झुला सजवला आहे त्या ठिकाणी सुंदर रांगोळी काढू शकता. आशा आहे की, खाली दिलेले व्हिडीओ तुम्हाला तुमच्या जन्माष्टमीच्या सजावटीसाठी कमी येतील. हे देखील वाचा: Sankashti Chaturthi August 2024 Moon Rise Timings: मुंबई, पुणे, नाशिक ते पणजी जाणून घ्या आजच्या संकष्ट चतुर्थी चंद्रोदयाच्या वेळा काय?
झुला कसा सजवायचा, पाहा व्हिडीओ:
झुला कसा सजवायचा, पाहा व्हिडीओ:
झुला कसा सजवायचा, पाहा व्हिडीओ:
झुला कसा सजवायचा, पाहा व्हिडीओ:
झुला कसा सजवायचा, पाहा व्हिडीओ:
तुम्ही ज्या ठिकाणी पाळणा बनवला आहे किंवा झुला सजवला आहे त्या ठिकाणचे आकर्षण वाढवण्यासाठी तुम्ही सुंदर रांगोळी देखील काढू शकता. आशा आहे की, हे व्हिडीओ तुम्हाला तुमच्या जन्माष्टमीच्या सजावटीसाठी मदत करतील.