कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami ) म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस. हिंदू धर्मीय हा सण गोकुळाष्टमी (Gokulashtami) म्हणून देखील साजरा करतात. कृष्ण जन्माष्टमी यंदा भारतामध्ये 29 ऑगस्ट ला साजरी केली जाणार आहे. भगवान विष्णूंनी घेतलेल्या एक अवतारांपैकी श्रीकृष्ण आहे. नटखट कृष्ण कन्हेय्या ते युद्ध भूमीवर अर्जुनाला उपदेश करणारे श्रीकृष्ण असा विविध टप्प्यावरील त्यांचं रूप, उपदेश, लीला आजही मनाला भावणार्या आहेत. कृष्णजन्माष्टमीला रात्री 12 वाजता कृष्ण जन्म साजरा केला जातो. यंदा या कृष्ण जन्मानिमित्त तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, प्रियजणांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देण्यासाठी लेटेस्टली मराठी कडून तयार करण्यात आलेले हे फोटोज तुम्ही नक्की डाऊनलोड करू शकता. सोशल मीडीयात व्हॉट्सअॅप स्टेटस, स्टिकर्स, फेसबूक मेसेजेस, Wishes, GIFs द्वारा जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमीचा आनंद द्विगुणित करू शकता. (नक्की वाचा: Happy Janmasthami 2021: छप्पन भोग म्हणजे काय? गोकुळाष्टमी निमित्त कृष्णाला दाखवण्यात येणाऱ्या 56 पदार्थांबद्दल जाणून घ्या अधिक).
बालवयातील कृष्ण कन्हेय्याच्या सांगितलेल्या कहाण्यांमध्ये त्याच वर्णन नटखट, माखनचोर असं आहे. त्यामुळे या दिवशी दूध, दह्याचे पदार्थ बनवले जातात. सण आणि उत्सवाच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपात जागोजागी दहीहंड्या फोडल्या जातात. आता दहीहंडी हा सण देखील परंपरा जपत पण तरीही एका खेळाप्रमाणे खेळवला जातो. यंदा सणांवर अजूनही कोरोनाचं सावट असल्याने यावर्षी दहीहंडी गल्लोगल्ली उभारून त्या फोडल्या जाणार नाहीत.(Happy Janmashtami 2021 Messages: जन्माष्टमी दिवशी खास मराठी Wishes, Whatsapp Status, Greetings शेअर करून साजरा करा श्री कृष्ण जन्मदिवस)
पण सणाचा आनंद आता व्हर्च्युअली भेटून आणि सोशल मीडीयाद्वारे साजरा करण्यासाठी दिवसाची सुरूवात शुभेच्छा देऊन नक्की करा.
कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
गोकुळाष्टमी सणाच्या
सर्व कृष्णभक्तांना हार्दिक शुभेच्छा
कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख,
मिळून कृष्ण भक्तीत सारे
हरी गुण गाऊ एकत्र..
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रीकृष्ण जन्माष्टमी सणाच्या
खूप सार्या शुभेच्छा
अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
गोकुळाष्टमी सणाच्या
सर्व कृष्णभक्तांना हार्दिक शुभेच्छा
दरम्यान यंदा कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी गोविंदाचा थरार नसेल. सरकार कडून राज्यात गोविंदाच्या 'ढाक्कुमाकूम' वर बंदी आहे. मंदिरं बंद आहेत त्यामुळे घरातच राहून सुरक्षित वातावरणामध्येच आपल्याला हा सण साजरा करावा लागणार आहे.