Happy Krishna Janmashtami: भगवान विष्णूंचा एक अवतार म्हणजे श्रीकृष्ण (Shri Krishna)! हिंदू धर्मीयांच्या मान्यतांनुसार श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमी दिवशी झाला आहे. त्यामुळे हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमीचा (Krishna Janmashtami) म्हणून साजरा केला जातो. गोकुळात भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेतला असल्याने हा दिवस गोकुळाष्टमी (Gokulashtami) म्हणून देखील साजरा केला जातो. यंदा गोकुळाष्टमी 18 ऑगस्ट दिवशी साजरी केली जाणार आहे. रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. मग अशा या मंगलदिवसाच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजणांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना पाठवून हा दिवस तुम्ही नक्की साजरा करू शकता. सोशल मीडीया मध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status), स्टिकर्स, फेसबूक मेसेजेस (Facebook Messages), Wishes, GIFs द्वारा जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमीचा सण साजरा करू शकता.
नटखट कृष्ण कन्हय्या ते युद्ध भूमीवर अर्जुनाला उपदेश करणारे श्रीकृष्ण असा विविध टप्प्यावरील त्यांचं रूप, उपदेश, लीला आजही मनाला भावणार्या आहेत. म्हणूनच दरवर्षी श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. कृष्णभक्त जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास ठेवतात. यादिवशी जेवणाचाही खास बेत असतो. नक्की वाचा: Shri Krishna Janmashtami 2022 Date: 18 की 19 ऑगस्ट? जाणून घ्या श्री कृष्ण जन्माष्टमीची नेमकी तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी, पाहा .
श्रीकृष्ण जयंतीच्या शुभेच्छा
ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख,
मिळून कृष्ण भक्तीत सारे
हरी गुण गाऊ एकत्र..
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
गोकुळाष्टमी सणाच्या
सर्व कृष्णभक्तांना हार्दिक शुभेच्छा
गोकुळमध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच सार्यांचा लाडका कृष्ण कन्हैय्या
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं ।
राम नारायणं जानकी वल्लभं ॥
कृष्ण जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रीकृष्ण जयंतीच्या सोहळ्यानंतर दुसरा दिवस हा दहीहंडी अर्थात गोपाळकाला खेळण्याचा असतो. 'ढाक्कुमाकूम'च्या तालावर यंदा तब्बल दोन वर्षांनी पुन्हा गोविंदा थिरकणार आहेत. उंचच उंच बांधली जाणारी हंडी फोडण्यासाठी गोविंदा प्रयत्नांची शर्थ करत असतात.