Krishna Janmashtami 2020| Photo Credits: Twitter/ ANI

भारतामध्ये काल (11 ऑगस्ट) पासून कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सुरू झाला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल रात्री कृष्ण जन्म साजरा झाला आहे. तर मथुरेसह काही ठिकाणी आज 12 ऑगस्ट दिवशी कृष्ण जन्मोत्सवाला सुरूवात झाली आहे. श्रावण कृष्ण अष्टमीच्या दिवशी कृष्णाचा जन्म झाला असे हिंदू पुराण कथेमध्ये सांगितले आहे. त्यानुसार, सर्वत्र रोहिणी नक्षत्रावर अष्टमीच्या रात्री कृष्ण जयंती साजरी केली जाते. यंदा कोरोनाचं संकट असल्याने सर्वत्र मंदिरं उघडण्यात आली नाहीत. मात्र काही इस्कॉन मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात कृष्ण जन्माचा सोहळा सुरू झाला आहे.

मुंबई, नोएडा येथील इस्कॉन मंदिरातून कृष्ण जन्मोत्सव सोहळा लाईव्ह पाहण्यासाठी फेसबूक, युट्युबवरून सोय करण्यात आली आहे.

इस्कॉन नोएडा

पंचमाथा मंदिर, मध्य प्रदेश

कृष्ण जन्मस्थान मंदिर, उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील मथुरा हे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान मानले जाते. तेथे आज रात्री कृष्ण जन्म साजरा होणार आहे.

इस्कॉन मंदिर, दिल्ली

श्रावण कृष्ण अष्टमीच्या रात्री गोकुळाष्टमी साजरी झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी दहीकाला म्हणजेच दहीहंडी साजरी केली जाते. यंदा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.