Kisan Diwas 2019 Wishes: किसान दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Messages, HD Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करा आंनद; शेतकरी बांधवांना देऊ शकाल कामाची पोचपावती
Kisan Diwas 2019 Wishes (Photo Credits: File Image)

Kisan Diwas 2019: 'जय जवान जय किसान' या घोषणेचा पुरस्कर्ता आपला देश हा 21 व्या शतकातही शेतीप्रधान म्ह्णून ओळखला जातो. औद्योगिकरण आणि जागतिकीकरणाच्या स्पर्धेत शेती या प्राथमिक व्यवसायाचे मूळ आजही अगदी अभिमानाने जपले जाते. याच शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी 2001 पासून आजचा दिवस म्हणजेच 23 डिसेंबर हा राष्ट्रीय किसान दिवस म्ह्णून साजरा केला जातो. या दिवसाचे निमित्त असे की, शेतकऱ्यांसाठी राजकीय स्तरावरून मोठे कार्य केलेल्या चौधरी चरण सिंह (Choudhari Charan Singh) यांची आज जयंती असते, चरण सिंह यांनी आपल्या कार्यकाळात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना करून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले होते.  आजच्या या दिवशी आपणही आपल्या शेतकरी बांधवाना तुम्हीही एक प्रेमळ गिफ्ट देऊ शकता यासाठी फार विचार करण्याची आवश्यकता नसून केवळ या Messages, HD Images, WhatsApp Status च्या माध्यमातील शुभेच्छांच्या रूपात शेतकऱ्यांना कामाची पोचपावती देता येईल. Kisan Diwas 2019 : राष्ट्रीय शेतकरी दिन नेमका का साजरा केला जातो? जाणून घ्या

अलीकडे कुठल्याही खास दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याला विशेष महत्व आहे.. मात्र यासाठी मोठेमोठे मॅसेज शोधताना दमछाक होते  यामुळे वाचणाऱ्याचा वेळ वाचवत तुमच्या सदिच्छा मात्र हव्या तश्या पोहचवता येतात. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही काही फ्री टू डाउनलोड आणि रेडिमेड शुभेच्छापत्रे तयार केली आहेत...

Kisan Diwas 2019 Wishes (Photo Credits: File Image)
Kisan Diwas 2019 Wishes (Photo Credits: File Image)

Kisan Diwas 2019: किसान दिवस निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौधरी चरण सिंह यांना वाहिली श्रद्धांजली

Kisan Diwas 2019 Wishes (Photo Credits: File Image)
Kisan Diwas 2019 Wishes (Photo Credits: File Image)
Kisan Diwas 2019 Wishes (Photo Credits: File Image)

दरम्यान, देश कितीही शेतीप्रधान असला तरी वास्तविक शेतकऱ्यांची सद्य स्थिती काहीशी बिकटच आहे. कर्ज, आत्महत्या यामुळे शेतकरी दबून जात आहे या जगाच्या पोशिंद्याला दुःखाच्या डोंगराखाली दबून जाऊ द्यायचे नसल्यास, प्रशासनासोबत हात मिळवून आपण प्रत्येक भारतीयाने शक्य होईल त्या स्वरूपात मदत करायला हवी.