Choudhari Charan Singh And PM Narendra Modi (Photo Credits: ANI, File Image)

शेतीप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात आजचा दिवस हा अत्यंत खास आहे. देशवासीयांचे पोट भरणाऱ्या बळीराजाच्या सन्मानासाठी आजचा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिवस म्ह्णून साजरा केला जातो, हाच दिवस निवडण्याचे औचित्य असे की या दिवशी (23 डिसेंबर) देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह (Choudhari Charan Singh) यांची जयंती असते, चरण सिंह यांनी आपल्या कार्यकाळात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना करून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले होते. याच कामाची जाण ठेवत 2001 पासून अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpeyee)  यांच्या सरकारने हा दिवस शेतकरी दिवस (Farmers Day) म्ह्णून साजरा करण्याचे घोषित केले. आज, दिवंगत चरण सिंह यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी ट्विटर वरून त्यांना अभिवादन केले आहे.

नरेंद्र मोदी यांनी ट्विट मध्ये, चौधरी चरण सिंह यांच्या स्मृतीला अभिवादन करताना त्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचे सुद्धा स्मरण केले. तसेच,उपेक्षितांसाठी सिंह यांनी कामे करून भारताची लोकशाही मजबूत करण्यात हातभार लावल्याचा सुद्धा उल्लेख मोदींनी केला. Kisan Diwas 2019 : राष्ट्रीय शेतकरी दिन नेमका का साजरा केला जातो? जाणून घ्या

नरेंद्र मोदी ट्विट

दरम्यान, जय जवान-जय किसान" असा नारा देणाऱ्या भारतामध्ये शेतकऱ्यांची सद्य स्थिती अत्यंत बिकट होत आहे. शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. या जगाच्या पोशिंद्याला दुःखाच्या डोंगराखाली दाबून जाऊ द्यायचे नसल्यास, प्रशासनासोबत हात मिळवून आपण प्रत्येक भारतीयाने शक्य होईल त्या स्वरूपात मदत करायला हवी.