Karwa Chauth 2024 फोटो सौजन्य - File Image)

Karwa Chauth 2024 Puja Samagri List: करवा चौथ (Karwa Chauth 2024) हा विवाहित महिलांनी साजरा केला जाणारा पवित्र सण आहे, जो यावर्षी 20 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना करते आणि त्याच्यासाठी निर्जला व्रत करते. करवा चौथच्या पूजेच्या वेळी थाळी सजवणे आणि चंद्राला अर्घ्य देणे याला विशेष महत्त्व आहे. जर तुम्हीही नववधू असाल आणि करवा चौथ पहिल्यांदाच साजरा करत असाल तर पूजा थाळीत या गोष्टी नक्की ठेवा.

प्रथमच करवा चौथ व्रत करणाऱ्या महिलांनी आपली पूजा थाळी व्यवस्थित सजवावी. पूजेच्या ताटामध्ये फुले, फळे, बेलपत्र, रोळी, कुंकुम, चंदन आणि तांदूळ ठेवा. करवा चौथच्या वेळी पाण्याचे भांडे, दुधाचे भांडे, मातीचा दिवा, करवा चौथ कथेचे पुस्तक सोबत ठेवा.

करवा चौथसाठी लागणाऱ्या वस्तूंची संपूर्ण यादी -

  • साहित्य ठेवण्यासाठी पूजेचं ताट
  • मातीचा करवा आणि झाकण
  • चाळणी
  • दिवा
  • पाण्याचे भांडे
  • गंगाजल
  • चंदन
  • कुंकू
  • रोली
  • रूई
  • अगरबत्ती
  • अक्षत
  • फूल
  • कच्चे दुध
  • दही
  • गावरान तूप
  • मध
  • मिठाई
  • साखर
  • हळद
  • तांदूळ
  • मेहंदी
  • महावर
  • सिंदूर
  • कंगवा
  • टिकली
  • लाल रंगाची ओढणी
  • बांगड्या
  • आठ पुऱ्या
  • हलवा
  • दक्षिणा साठी पैसे

सुनेला सासूकडून मिळतात या गोष्टी -

करवा चौथला सासू सुनेला सरगी देते, ही परंपरा पंजाबी पाळतात. उपवास करणाऱ्या पंजाबी स्त्रिया सकाळी सरगी खातात. पहाटे 4 वाजण्यापूर्वी सरगी खावी लागते. या दरम्यान सासू आपल्या सुनांना खाद्यपदार्थ, मिठाई, शेवया, 16 मेकअपचे साहित्य, पूजेचे साहित्य इत्यादी भेटवस्तू देतात. उपवास करणाऱ्या महिला सरगीमध्ये फळे आणि सुका मेवा खातात.