पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की आषाढ महिन्याचे वेध लागण्यास सुरूवात होते. वारकर्यांसोबतच सामान्य विठू माऊलीच्या भक्तांचा सण आषाढी एकादशी हा या महिन्यातील एक मोठं अकर्षण असतं. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरूवात होते. या चातुर्मासाच्या काळात कांदा,लसूण, वांगं असे पदार्थ खाणं वर्ज्य केली जातात. त्यामुळे आषाढी एकादशी पूर्वी आषाढ शुद्ध नवमी दिवशी 'कांदे नवमी' साजरी केली जाते. यंदा कांदे नवमी (Kande Navami) 10 जुलै 2019 दिवशी साजरी केली जाणार आहे.
आषाढ महिन्यात पावसाचे दिवस असतात. यामुळे कांदा सडतो. तसेच वातवरणामध्ये बदल होतात, नैसर्गिकरित्या या ऋतूमध्ये शरीरातची वाताचे प्रमाण वाढते. त्यामुळे किमान आहारात वातूड पदार्थ टाळण्याचा नियम आहे. म्हणूनच आषाढ ते कार्तिक महिन्यात कांदा, लसुण, वांगं हे पदार्थ टाळले जातात. यंदाची कांदे नवमी बनवा स्वादिष्टपूर्ण, करुन पाहा या कांद्याच्या सोप्या 5 रेसिपी
कांदे नवमी दिवशी काय कराल?
कांदा पावसाळ्याच्या दिवसात आषाढी एकादशीपासून सुरू होणार्या चातुर्मासाच्या काळात टाळला जातो त्यामुळे घरातील कांदा कांदे नवमीचं औचित्य साधून काही स्वादिष्ट पदार्थ बनवून संपवले जातात. यामध्ये कांदा भजी, वांग्याचं भरीत, कांद्यांचं थालीपीठ असे पदार्थ बनवले जातात.
यंदा आषाढी एकादशी 12 जुलै 2019 दिवशी महाराष्ट्रभरात साजरी केली जाणार आहे. तर यंदा तुमचा कांदे नवमीचा बेत काय आहे? हे आमच्यासोबत नक्की शेअर करा.