माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही जया एकादशी (Jaya Ekadashi) म्हणून साजरी करण्याची रीत आहे. या दिवशी भगवान विष्णूचं पूजन केले जाते. हिंदू धर्मीय जया एकादशीला महत्त्वपूर्ण व्रतांपैकी एक मानतात. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सारी दु:ख दूर होतात. ही एकादशी पुण्यकारी मानली जाते. यंदा ही एकादशी 1 फेब्रुवारी दिवशी असल्याने तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना प्रियजनांना या जया एकादशीच्या शुभेच्छा WhatsApp Messages, Status, Greetings, HD Images द्वारा शेअर करत या दिवसाच्या शुभेच्छा देत आनंदामध्ये या दिवसाची सुरूवात करा.
जया एकादशीच्या शुभेच्छा
जया एकादशीचे व्रत ठेवल्यास मोक्ष प्राप्त होतो. जया एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीची सारी पापं नाहीशी होतात. तसेच त्याला स्वर्गात स्थान मिळते. अशी देखील काहींमध्ये धारणा असते.
महाराष्ट्रामध्ये माघी यात्रा संपन्न होते. त्या निमित्ताने काना कोपर्यातून भाविक मंडळी पंढरपूरात विठठल रूक्मिणी मातेच्या दर्शनाला येतात. यंदाही पंढरपूरात मंदिराला विशेष रोषणाई करण्यात आली आहे.