Happy Jagannath Rath Yatra 2020 Wishes: भारतावर कोरोना व्हायरसची (Coronavirus) टांगती तलवार कायम असल्यामुळे यंदा सणांनिमित्त होणारे यात्रा, कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर ओडिशामधील प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेमध्ये (Jagannath Rath Yatra 2020) यंदा कोरोनामुळे बदल करण्यात आले आहेत. आज (23 जून) जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात होणार आहे. परंतु, लोकांची गर्दी न करता, करोना चाचणीत निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या पुजाऱ्यांना परवानगी देत ही रथयात्रा आणि पुरी मधील प्रसिद्ध चेरियट उत्सव पार पाडण्यास सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. परंतू तरीही लोकांनी खबरदारी म्हणून घरात राहून या सणाच्या शुभेच्छा देऊन हा सण साजरा केला पाहिजे.
13 व्या शतकात या रथयात्रेला सुरुवात झाली होती असे इतिहासकार सांगतात. गेल्या 284 वर्षात कधीही ही यात्रा रद्द करण्यात आलेली नाही. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे यात काही बदल करण्यात आले. म्हणून लोकांनी सामाजिकतेचे भान ठेवून घरी राहून आपल्या आप्तलगांना पुरी सणाच्या शुभेच्छा द्या.
जगन्नाथ यात्रेचे शुभेच्छा संदेश:
हिंदु दिनदर्शिकेनुसार आषाढी महिन्याच्या दुसर्या दिवशी जगन्नाथ यात्रा काढली जाते. दरम्यान, भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा तिन्ही देवतांची रथ यात्रा काढली जाते. जगन्नाथ रथाला नंदीघोष आणि बलभद्र रथला तलध्वजा तर, सुभद्राच्या रथला पद्मध्वजा अशी नावे दिली गेली आहेत.