8 मार्च हा जागतिक महिला दिन (International Women's Day) म्हणून साजरा केला जातो. समान हक्क, न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षात महिलांनी मोठा लढा दिला. त्यामुळेच आज आपण स्त्रियांना विविध क्षेत्रात प्रगती पथावर पाहतो. तसंच महिलांची सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध स्तरावरील प्रगतीचा सन्मान या दिनानिमित्त करण्यात येतो. मात्र आपल्या आयुष्यातील प्रत्येक महिला आई, आजी, बहिण, मैत्रिण, बायको, मुलगी या सर्वांचाच सन्मान करण्याचा हा दिवस. त्यांनी आपल्यासाठी केलेल्या असंख्य लहान सहान गोष्टींची जाणीव ठेवून त्यांचा आदर करण्याचा हा दिवस. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महिलेला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, WhatsApp Status, Wishes आणि शुभेच्छापत्रं..... ( नक्की वाचा: भारतीय महिलांना आहेत हे '8' खास अधिकार!)
इंग्रजी मध्ये लेडी, मराठीत महिला, हिंदी मध्ये नारी...
यांची साथ नसेल तर, आहे बातच अधुरी...
ठेवा लक्षात एक गोष्ट, एक ना एक दिवस पडेल ही
संपूर्ण दुनियेला भारी...!!!
ज्याला स्त्री 'आई' म्हणून कळली तो जिजाऊचा "शिवबा" झाला…
ज्याला स्त्री 'बहीण' म्हणून कळली तो मुक्ताईचा "ज्ञानदेव" झाला…
ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणून कळली तो राधेचा "श्याम" झाला…
आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सितेचा "राम" झाला…
विधात्याची नवनिर्माणाची
कलाकृती तू...
एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा
साजरा कर तू...
रात्री रस्त्यावरुन जाणारी प्रत्येक मुलगी
ही संधी नसून जबाबदारी आहे...
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू
झाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू...
आपल्या आयुष्यातील प्रत्येक महिलेची महती अगदी सोप्या शब्दात सांगणारा हा व्हिडिओ....
महिला दिनानिमित्त खास Whats app Status...
स्त्री ने अनेक क्षेत्रात आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे. घर, संसार, नोकरी, कुटुंब ही तारेवरची कसरत ती अगदी लिलया सांभाळते. मात्र या सगळ्यात स्वतःच्या आरोग्याकडे, इच्छांकडे, मतांकडे दुर्लक्ष करु नका. कोणतरी चांगलं म्हणण्यासाठी, कौतुक करण्यासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध निर्णय घेऊ नका. तुमच्या इतकंच तुमच्या इच्छांना, विचारांना आणि मतांना महत्त्व द्या. जागतिक दिनानिमित्त हा एक बदल आपण आपल्यात नक्कीच करु शकतो.