
8 मार्च हा जागतिक महिला दिन (Women's Day) म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने आपल्या आयुष्यातील स्त्रियांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. सामाजिक जडण-घडणीमध्ये महिलांचं योगदान देखील मोठं आहे मात्र त्यांना त्यासाठी अपेक्षित मान-सन्मान, समानतेची वागणूक मिळत नाही. म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर एका विशिष्ट थीमवर जागतिक महिला दिन साजरा करण्याची पद्धत सुरू झाली. यंदाच्या वर्षी जागतिक महिला दिनी "Gender Equality Today for a Sustainable Tomorrow" यावर महिला दिनाचं सेलिब्रेशन होणार आहे. मग तुमच्या आयुष्यातील आई, बहिण, पत्नी, मैत्रिण या नात्याच्या अनुषंगाने आलेल्या प्रत्येक स्त्रीचा आजचा दिवस खास करण्यासाठी 'जागतिक महिला दिन' च्या शुभेच्छा मराठी संदेश, Quotes, Messages, HD Images द्वारा शेअर करत नक्की सोशल मीडीयामध्ये शेअर करा.
जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत महिला जगभरात सामोरं जात असलेल्या अनेक प्रश्नांना संबोधित केले जातं. त्यांना देखील समानतेचा अधिकार आहे याबाबत समाजात प्रबोधन करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हे देखील नक्की वाचा: Happy Women's Day 2022 Wishes for Mother: Greetings, Messages and Images शेअर करून साजरा करा आंतरराष्ट्रीय महिला दिन.
महिला दिन विशेष मेसेजेस

'ती' आहे म्हणून
सारे विश्व आहे
'ती' आहे म्हणून
सारे घर आहे
'ती' आहे म्हणून
सुंदर नाती आहेत
'ती' आहे म्हणून
नात्यांमध्ये प्रेम आहे
महिला दिनाच्या शुभेच्छा

स्त्री आहे या सृष्टीचा आधार
करा स्त्रीचा नेहमीच सन्मान
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विधात्याची निर्मिती तू
प्रयत्नांची पराकाष्ठा तू
एक दिवस तरी साजरा
तुझ्यासाठी कर तू
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे
गगनही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व सारे वसावे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

तुझ्यामुळे जन्म माझा
पाहिले हे जग मी
कसे फेडू ऋण तुझे
अनंत जन्मांचा कृतज्ञ मी
महिला दिनाच्या शुभेच्छा
सर्वप्रथम 1909 मध्ये 'जागतिक महिला दिन' साजरा केला गेला. मात्र 1975 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने एका थीमसह महिला दिन साजरा करण्याची प्रथा सुरु केली. तेव्हापासून याला अधिकृत मान्यता मिळाली. महिला दिनाची पहिली थीम होती- 'सेलिब्रेटींग द पास्ट, प्लॅनिंग फॉर द फ्युचर.' 1908 मध्ये 15 हजार महिलांनी न्युयॉर्क शहरात मतदानाच्या अधिकारासाठी, कामाचे तास कमी करण्यासाठी आणि चांगल्या रोजगारासाठी मोर्चा काढला होता. त्यानंतर अमेरिकेच्या समाजवादी पार्टीने केलेल्या घोषणेनुसार, 1909 मध्ये युनाईटेड स्टेट्स मध्ये पहिला राष्ट्रीय महिला दिवस 28 फेब्रुवारीला साजरा केला गेला.