Happy Vat Purnima 2020 Marathi Wishes: ज्येष्ठ महिन्यात शुक्लपक्षात येणाऱ्या पौर्णिमेला 'वटपौर्णिमा' (Vat Purnima) केली जाते. सवाष्ण महिलांसाठी महत्त्वाचा असणार्या या सणासाठी अनेक जणी उत्सुक असतात. यंदाही 5 जून दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रिया पतीच्या दिर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती लाभावा यासाठी वटसावित्रीचे व्रत करतात. नवविवाहीत मुलींसाठी हा सण अगदी खास असतो. वटपौर्णिमेदिवशी स्त्रिया साज शृंगार करुन वडाच्या झाडापाशी एकत्र जमतात. त्यानंतर वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळून वडाची पूजा केली जाते. फळांनी भरलेले वाण वडाला अपर्ण करुन स्त्रिया एकमेकींना वाटतात. काही स्त्रिया घरीच वडाची फांदी आणून वडाची पूजा करतात. सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून वटपौर्णिमेचे संदेश, मेसेज पाठवून तुम्ही वटपौर्णिमेच्या शुभेच्छा (Vat Purnima Wishes) देऊ शकता. त्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Greetings, Images फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम यावरुन आपल्या प्रियजनांसोबत शेअर करुन सणाचा आनंद द्विगुणित करा. (Vat Purnima Vrat 2020: वटपौर्णिमा साजरी करताना कोरोना व्हायरसच्या संकटाचे ठेवा भान; पूजा करताना घ्या 'अशी' खास काळजी)
वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश!
सण सौभाग्याचा
बंध अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत
तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
वडाच्या झाडाइतकं
दीर्गायुष्य मिळो तुला,
जन्मोजन्मी असाच तुझा
सहवास लाभो मला
वटपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!
विचार आधुनिक आपले जरी
श्रद्धा देवावर आपली
करण्या रक्षण आपल्या सौभाग्याचे
करुया वटपौर्णिमा साजरी
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
प्रार्थना सौभाग्याची,
पूजा वटपौर्णिमेची
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
पतीच्या दिर्घायुष्यासाठी निष्ठेचे बंधन
सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मींचे समर्पण
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
वटपौर्णिमेच्या पूजाला सत्यवान-सावित्री यांच्या कथेची जोड असली तर वडाच्या झाडाचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. वडाचे झाड 24 तास ऑक्सिजन देते. तसंच त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. त्यामुळे पूर्वी घराबाहेर न पडणाऱ्या स्त्रियांना पूजेनिमित्त घराबाहेर पडता येत होते. त्यामुळे ताण-तणाव, नैराश्य दूर होऊन सकारात्मक ऊर्जा, चैतन्यमय वातावरण स्त्रियांना लाभत असे. तसंच वाण देण्यातून ‘गिविंग ऑफ हॅप्पीनेस’ मिळत होता.