
भारत यंदा 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करत आहे. 26 जानेवारी 1950 दिवशी भारताने संविधान स्वीकारत पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला होता. त्यानिमित्ताने दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. मग या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने प्रत्येक भारतीयाला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत हा दिवस खास करण्यासाठी सोशल मीडीयामध्ये WhatsApp Messages, WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes, HD Images द्वारा शुभेच्छा देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता. त्यासाठी खालील शुभेच्छापत्रं तुम्ही नक्कीच डाऊनलोड करू शकता.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजधानी दिल्ली मध्ये पंतप्रधानाच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज फडकवला जातो. तसेच राजपथावर खास कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा सांस्कृतिक सोहळा पाहणं डोळ्यांचं पारण फिटवणारा एक अनुभव असतो. दरम्यान यंदा 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इजिप्तचे राष्ट्रपती मुख्य अतिथी म्हणून हजेरी लावणार आहेत. नक्की वाचा: Republic Day 2023 Rangoli Ideas: प्रजासत्ताक दिनाला काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन व्हिडीओ, खास तुमच्यासाठी, पाहा.
74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

उत्सव तीन रंगांचा, आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा भारत देश घडवला
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा

74व्या प्रजासत्ताक दिनाच्या भारतीयांना शुभेच्छा

लहरतो आहे तिरंगा अभिमानाने
उंच आज या आकाशी
उजळत ठेऊ सारे रंग त्याचे
घेऊ प्रण हा मुखाने
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

जसा दिल्ली मध्ये प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडतो तसेच देशभर ठिकठिकाणी भारताचे झेंडे फडकवले जातात. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळकरी मुलं स्वातंत्र्यसेनानींच्या वेशभूषा करत या सोहळ्यात सहभहगी होतात. यानिमित्ताने पुढील पिढीवर भारतमाते प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचे संस्कार दिले जातात.