
Indian Army Day in Marathi: भारतीय सैन्य दिन (Indian Army Day ) दरवर्षी 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारतीय सैन्याचे पहिले कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांच्या स्मृतीप्रित्यार्थ हा दिन साजरा केला जातो. यंदा भारताचा 75 वा आर्मी डे (75th Army Day) आहे. ज्यांनी देशासाठी बलिदान दिले अशा सैनिकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी लोक एकमेकांना जाबदारीची जाणीव करुन देतात. युद्धात शहीद झालेल्या भारतीय सेनेच्या शूरवीरांच्या स्मरणार्थ त्यांना या दिवशी आदरांजली वाहिली जाते. भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि पारतंत्र्यात ब्रिटीश आर्मी अशी ओळख पूसली जाऊन भारतीय सैन्य म्हणजेच इंडियन आर्मी (Indian Army ) उदयास आली. भारतीय सेना दिनाच्या शुभेच्छा देण्याासाठी आम्ही मराठमोळी ग्रीटिंग्स, Images, Quotes, WhatsApp Status, Messages देत आहोत. ज्या आपण इथून डाऊनलोड करु शकतात.
आर्मी डे आपल्या देशाच्या सैनिकांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करतो. ज्यांनी निःस्वार्थ सेवा, बंधुता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशावरील प्रेमाचे सर्वात मोठा वास्तूपाठ घालून दिला आहे.. युनायटेड स्टेट्स, रशिया आणि चीन यांसारख्या महासत्तांशी स्पर्धा करत जगातील सर्वोच्च सैन्यांमध्ये भारतीय लष्कराचा क्रमांक लागतो, हे सांगतानाही आपल्याला आज मोठा अबिमान वाटतो.




1947 मध्ये जरी देशाला ब्रिटीश राज्यकर्त्यांपासून स्वातंत्र्य मिळाले असले तरी दोन वर्षांनंतर 1979 पर्यंत भारतीय सैन्याच्या हाती अधिकृत लगाम नव्हता. अखेर 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाली. राज्यघटनेनुसार घोषित करण्यात आले आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की स्वातंत्र्य हा केवळ एका दिवसाचा लढा नव्हता तर एक दीर्घ प्रक्रिया होती.



स्वातंत्र्य मिळाल्यानंतर के.एम. करिअप्पा हे भारताचे पहिले मुख्य कमांडर बनले त्या दिवसाच्या सन्मानार्थ हा दिवस नवी दिल्लीतील अनेक लष्करी कमांड मुख्यालयात साजरा केला जातो. देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या लष्करातील खऱ्या सैनिकांचा या दिवशी सन्मान केला जात असल्याने या दिवसाला राष्ट्रीय महत्त्व आहे. देशाच्या रक्षणासाठी रणांगणावर त्यांनी केलेल्या धाडसी कृतीला सलाम केला जातो.