Happy Hug Day 2024 Wishes: 'हग डे'च्या दिवशी Romantic Greetings, WhatsApp Messages, Status शेअर करत स्पेशल करा आजचा दिवस
हॅप्पी हग डे । File Image

व्हेलेंटाईन वीक (Valentine Week) मधील सहावा दिवस म्हणजे हग डे. 12 फेब्रुवारी दिवशी हग डे (Hug Day) साजरा केला जातो. प्रेम व्यक्त करण्यासाठी जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा अगदी लहान लहान पण रोमॅन्टिक अंदाजातही प्रेम व्यक्त केलं जाऊ शकतं. प्रेमाची एक मिठी देखील अनेक गोष्टी कळत नकळत व्यक्त करते. मग प्रेम मिठीतून व्यक्त करण्यासाठी 'हग डे' च्या शुभेच्छा तुमच्या पार्टनरला देण्यासाठी ही खास मराठमोळी ग्रीटिंग्स, Wishes, Messages, WhatsApp Status, Stickers, Photos शेअर करून तुम्ही या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकाल.

हग डे दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला मिठीत घेत प्रेमाची ताकद दाखवण्याचा दिवस आहे. एखाद्या विशिष्ट व्यक्तीला मिठी मारल्याने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची पातळी कमी होते, तुमचा मेंदू जास्त सेरोटोनिन हार्मोन तयार करतो, ज्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो. अनेकदा यामुळे योग्य व्यक्तीला योग्य वेळी मिठी मारल्यानंतर मानसिक मरगळ कमी झाल्यासारखी वाटते. Valentine's Week: प्रेमास मिळालेला नकार कसा स्वीकाराल? 'व्हॅलेंटाईन विक'मध्ये खचून जाऊ नका, समजून घ्या .

हग डे च्या शुभेच्छा !

आपलं आलिंगन बरंच काही सांगते

तू आजूबाजूला नसशील तेव्हा हमखास आठवण तुझी सलते

Happy Hug Day

Happy Hug Day | File Image मिठीत तुझ्या असताना

वेळेनेही थोडं थांबावं,

क्षणभंगूर त्या क्षणांना तेव्हा दीर्घायुष्य लाभावं!

Happy Hug Day

Happy Hug Day | File Image
Happy Hug Day | File Image

कळत नाही काय होत तुझ्या मिठीत शिरल्यावर,

आयुष्य तिथंच थांबत तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर

Happy Hug Day

Happy Hug Day | File Image

बर्फासारख्या या थंडीमध्ये तुझ्या मिठीत विसावसं वाटतं

एका जन्माचं आयुष्य एका क्षणात जगावसं वाटतं

Happy Hug Day

Happy Hug Day | File Image

प्रेम माझं तुझ्यावरचं, कोणत्याच शब्दात व्यक्त होणार नाही,

तुला मिठीत घेताच कळतं, आता त्याचीही गरज भासणार नाही...

Happy Hug Day

व्हेलेंटाईन वीक हा प्रेमात पडलेल्या तरूणाई खास असतो. प्रत्येक दिवसागणिक वेगवेगळं सेलिब्रेशन करत ते पार्टनर सोबत नातं फुलवत असतात. दरम्यान व्हेलेंटाईन डे सेलिब्रेशन हा आता धर्म, देश, प्रांत या सीमा ओलांडून जगात सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.