व्हॅलेंटाईन सप्ताह (Valentine Week) सुरू होऊन 5 दिवस झाले आहेत. उद्या 12 फेब्रुवारी रोजी 'हग डे' (Hug Day 2020) साजरा केला जाईल. 'हग डे'च्या दिवशी लोक एकमेकांना प्रेमळ मिठी मारून, आपल्या भावना व्यक्त करतात. ज्यांच्याबद्दल प्रेम आहे त्यांना या दिवसाच्या शुभेच्छा देतात. एखाद्यास मिठी मारल्याने आपण त्याच्यासोबत आहोत हे भावना जागृत होते. तसेच एखाद्याचे एकटेपण दूर होण्यासही मदत होऊ शकते.
आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक असतात, जे स्वतःला एकटे समजतात, काहींचा मूड ठीक नसतो, काहींना समस्यांनी ग्रासले असते. अशावेळी एक प्रेमळ मिठी त्यांचे थोडे तरी टेन्शन दूर करू शकते. त्यामुळे यंदाच्या 'हग डे' ला अशा सर्वांना आलिंगन द्या ज्यांना तुमच्या मिठीची गरज आहे. जर का तुमची जवळची व्यक्ती, जोडीदार शारीरिक दृष्ट्या तुमच्या जवळ नसेल तर अशांना काही स्पेशल शुभेच्छा देऊन तुम्ही हा दिवस साजरा करू शकता. त्यासाठी या HD Greetings, Wishes, Messages, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून हा दिवस साजरा करू शकता.
दरम्यान, इ. स. 270 च्या आसपास एक ख्रिश्चन संत व्हॅलेन्टाईन होउन गेले. एका दंतकथेनुसार 14 फेब्रुवारी हा संत व्हॅलेन्टाईन चा हा बलिदान दिवस आहे. तर या व्हॅलेन्टाईन वीकमधील 'हग डे'ला आपल्या जोडीदाराला एक प्रेमाचे आलिंगन देऊन तुम्ही या दिवसाची सुरुवात करा. मात्र त्यानंतर आपल्या जोडीदाराला खुश करण्यासाठी तसेच हा स्पेशल दिवस साजरा करण्यासाठी एखादे छानसे गिफ्ट नक्की द्या.