Happy Holi 2020 Marathi Messages: फाल्गुन मासात म्हणजेच हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे शेवटच्या महिन्यात होळी (Holi) आणि रंगपंचमीचा (Rangpanchami) उत्साहपूर्ण सण साजरा केला जातो. वर्षाची सांगता करताना संपूर्ण वर्षभर आलेल्या वाईट अनुभवांना, दुःखांना होळीच्या आगीत अर्पण करून पुढे येणाऱ्या वर्षाचे स्वागत हसतमुखाने करण्याची ही सुरुवात आहे. यंदा 9 मार्च रोजी देशभरात विविध ठिकाणी होलिका दहन होणार आहे. अशा खास प्रसंगीतुमच्या आवडत्या आणि जवळच्या व्यक्तींना डिजिटली शुभेच्छा देऊन त्यांचाही दिवस तुम्ही खास करू शकता. काळजी करू नका यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागणार नाहीये.. आम्ही काही खास शुभेच्छा पत्रे तुम्हाला शेअर करता यावीत अशा रूपात आधीच तयार केली आहेत, अस्सल मराठमोळ्या ढंगातील हे होळीच्या शुभेच्छा देणारे संदेश, Wishes, Greeting, GIFs , तुम्ही Whatsapp Status, Facebook किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकता.
होळीच्या शुभेच्छा मराठी संदेश
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
रंगाचा सण हा आला,
आनंद, सुख शांती लाभो तुम्हाला
होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे
होळीच्या अणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा
आला रंगांचा सण.
मौज मस्ती धुमशान.
आज घराघरात पुरण पोळी रे.
आज वर्षाची होळी आली रे.
होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
आली होळी, आली होळी,नवरंगांची घेऊन खेळी
तारुण्याची अफाट उसळी, रंगी रंगू सर्वांनी
तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा
टाकून द्या होळीत आयुष्याच्या अडचणी, चिंता, मनाचा गुंता..
करू होम दु:ख, अनारोग्याचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Holi GIFs
दरम्यान, होळी हा सण सर्वांसाठीच खास असतो, महाराष्ट्रामध्ये होळीचा सण हा फाल्गुन (हुताशनी) पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो. या दिवशी रात्री लाकडांची होळी रचून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळी पेटवली जाते. या होळीत विघ्नांचा नाश व्हावा अशी प्रार्थना केली जाते. तर उत्तर प्रदेश मधील वृंदावन, वाराणसी, मथुरेत 15 दिवस आधीपासूनच होळीचा उत्साह पाहायला मिळतो, होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन आणि पाचव्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते.