 
                                                                 Hanuman Jayanti 2019: आज 19 एप्रिल सर्व हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत आहे. तसेच हनुमानाच्या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन आणि पूजा ठेवण्यात येतात. आजच्या दिवशी हनुमानाला प्रसन्न करुन आपले दु:ख, आनंद त्याच्या समोर व्यक्त करत निर्मळ भावनेने त्याची पूजा केली जाते.
त्यामुळे तुम्हाला जाणवत असणाऱ्या अडीअडचणी दूर होण्यास मदत होईल. तसेच हनुमानाची भक्तीभावाने पूजा करा. तर आजच्या दिवशी हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी आणि तुमच्या पाठी लागलेल्या त्रासाला दूर पळवण्यासाठी हनुमान जयंती दिवशी हे उपाय करा.(हेही वाचा-Hanuman Jayanti 2019: शक्तीची देवता 'हनुमान' विषयी जाणून घ्या 7 खास गोष्टी)
- हनुमानाची पूजा करण्यापूर्वी मस्तकाला लाल कुंकवाचा लेप लावून पूजा करा.
-हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्याला लाल रंगाची चोली अर्पण करा.
-तसेच दिवा लावताना त्यामध्ये तेल आणि लवंग टाकल्यास तुमचे कष्ट दूर होतात.
- पिंपळाच्या 11 पानांवर त्यावर श्रीराम लिहून हनुमानाला अर्पण करा.
-व्यापार-उद्योगधंद्यात भरभराट होण्यासाठी हनुमानाला या दिवशी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करा.
-शूत्रूंपासून सुटका मिळवण्यासाठी 5 तुपातील पोळ्यांचा नैवेद्य दाखवा.
हनुमानाला 'मारुती', 'बजरंगबली' अशी विविध नावे आहेत. हनुमान श्रीरामाचे एकनिष्ठ भक्त आणि सेवक होते.मारुतीरायाला प्रसन्न करून आत्मबळ प्राप्त होत असल्याची भक्तांची भावना असल्याने हनुमान जयंतीचा उतरावं आज जगभरातील हनुमान भक्तांमध्ये उत्साहाने साजरा केला जात आहे.तर तुम्हा सर्वांना आजच्या दिवशी हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!!!
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
