Happy Gudi Padwa 2022 Marathi Wishes: गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस, Quotes शेअर करत साजरा करा नववर्षाचा पहिला दिवस
गुढी पाडवा । File Image

Gudi Padwa Wishes in Marathi: चैत्र पाडवा (Chaitra Padwa) अर्थात मराठी नवं वर्षाचा पहिला दिवस. महाराष्ट्रात हा दिवस गुढीपाडवा (Gudi Padwa) म्हणून साजरा केला जातो. वसंत ऋतूची चाहूल देत येणारा हा मराठमोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा कोविड 19चं संकट शमल्याने दोन वर्षांनी पुन्हा जोशात हा सण साजरा केला जाणार आहे. मग 2 एप्रिल दिवशी साजरा होणार्‍या या गुढीपाडव्या निमित्त तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, प्रियजणांना मराठी नूतनवर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा WhatsApp Status, Stickers, Facebook Messages, Wishes, HD Images, GIFs द्वारा शेअर करत या सणाचा आनंद द्विगुणित करा.

महाराष्ट्रसह जगभरात पसरलेले मराठी बांधव यंदा 2 एप्रिल दिवशी गुढी पाडव्याचा सण साजरा करणार आहेत. त्यानिमित्त शोभा यात्रा रंगणार आहे. ठिकठिकाणी गुढ्या उभारून, गोडा-धोडाचं पदार्थ चाखून दणक्यात नवववर्षाचं स्वागत होणार आहे.  हे देखील नक्की वाचा: Chaitra Navratri 2022 Dates: यंदा चैत्र नवरात्रीची सुरूवात 2 एप्रिलपासून; जाणून घ्या घटस्थापनेची वेळ, मुहूर्त.

मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Gudi Padwa| File Imageचैतन्यमय झाला सारा परिसर नव्या पालवीने

गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाची सुरूवात करू

पुन्हा सकारात्मकतेने

मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढी पाडवा । File Image

गुढी पाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढी पाडवा । File Image

वसंताची चाहूल घेऊन आलं नववर्ष

मना-मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

गुढी पाडवा । File Image

आयुष्याला मिळेल नवी कलाटणी,

चला गुढी उभारू आनंदाची

नूतन वर्षाभिनंदन!

गुढी पाडवा । File Image

नव्या आशा अपेक्षांसह, नव्या संकल्पांनी करू

नववर्षाची सुरूवात

सुख, शांती समृद्धी नांदो

तुमच्या आमच्या घराघरात

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

ग्रेगेरियन कॅलेंडरची सुरूवात 1 जानेवारी दिवशी होते. पण शालिवाहन संवत्सरारंभ चैत्र पाडवा अर्थात गुढी पाडव्याला होते. यंदा गुढी पाडव्याला शालिवाहन शके 1944 ची सुरूवात होणार आहे. त्यामुळे हिंदू बांधव मोठ्या जल्लोषात महाराष्ट्रात नववर्षाची सुरूवात करतात.