
चैत्र पाडवा(Chaitra Padwa) अर्थात मराठी नववर्षाची सुरूवात महाराष्ट्रात गुढी पाडवा (Gudi Padwa) हा सण साजरा करून करतात. यंदा हाच गुढी पाडवा 2 एप्रिल 2022 दिवशी साजरा केला जाणार आहे. वसंत ऋतूची चाहूल देत आलेला चैत्र महिना जसा निसर्गात मुक्तहस्ते रंगांची उधळण करत असतो तशीच आनंदमय, जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये नववर्षाची सुरूवात करण्यासाठी महाराष्ट्रात घराघरामध्ये गुढी उभारली जाते. मग हाच आनंदाचा सण तुमच्या प्रियजणांच्या, नातेवाईकांच्या, आप्तेष्टांच्या, मित्र मंडळींच्या आयुष्यातही सुखाचे क्षण घेऊन येवोत ही कामना असेल तर नक्की गुढीपाडव्याच्या, मराठी नववर्षाच्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप स्टेटस(WhatsApp Status), मेसेजेस (Messages), Wishes, GIFs, HD Images द्वारा शेअर करत त्यांच्या दिवसाची सुरूवात मंगलमय वातावरणामध्ये करा.
गुढी पाडवा निमित्त महाराष्ट्रात शोभायात्रा काढण्याची जुनी परंपरा आहे. पण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यावर सरकारकडून निर्बंध आहेत. अजूनही कोविड 19 चं संकट पूर्णपणे शमलेले नसल्याने मागील दोन वर्षांच्या तुलनेत मोकळ्या वातावरणामध्ये पण काही नियमावलीमध्ये राहून हा सण साजरा करण्याचा सरकारचा मानस आहे. हे देखील नक्की वाचा: Gudi Padwa 2022 Rangoli Designs Video: गुढी पाडवाच्या काही सोप्या रांगोळी डिझाईन्सचे व्हिडिओ, खास तुमच्यासाठी.
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढी पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा..
नूतनवर्षाभिनंदन

आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्रात जसा गुढी पाडवा साजरा केला जातो तसाच तो हैदराबाद, तेलंगणा प्रांतात उगादी म्हणून साजरा केला जातो. या सणाच्या निमित्त गोडाचे पदार्थ बनवले जातात. पारंपारिक खाद्यसंस्कृतीचा देखील आस्वाद घेतला जातो. मग हा सण आनंदात साजरा करताना काही गोड क्षण तुमच्या प्रियजणांसोबतही शेअर करा.