
Happy Fathers Day 2023 Messages: वडिलांचे मुलांशी असलेले नाते सर्वात घट्ट असते. मुलाला पहिलं पाऊल टाकायला शिकवण्यापासून ते आयुष्यभर प्रत्येक पावलावर बाप त्याच्या पाठीशी उभा असतो. मुलांनी चांगले काम केल्यावर वडील त्यांची स्तुती करतात आणि गैरवर्तनासाठी त्यांना फटकारतात. रविवारी, 18 जून रोजी फादर्स डे साजरा केला जात आहे. फादर्स डे दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. हा दिवस वडिलांना आणि त्यांच्या प्रेम आणि त्यागांचा आदर देण्यासाठी समर्पित आहे.
वडील हे कोणतीही तक्रार न करता ते आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी आवश्यक ते काम करतात. वडील आपल्या कुटुंबाला निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी रात्रंदिवस काम करत असतात. फादर्स डे निमित्त पितृदिनानिमित्त Wishes, Greeting, Whatsapp Status, Images च्या माध्यमातून बाबांना शुभेच्छा देऊन त्यांचा हा दिवस नक्की खास करा. (हेही वाचा - Father's Day 2023 Songs: खास फादर्स डे निमित्त वडिलांप्रति प्रेम व्यक्त करण्यासाठी बाॅलिवूडमधील गाणी)
बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण
हॅप्पी फादर्स डे!

डोळ्यांत कधीही अश्रू न येणाऱ्या
पण मनात नेहमी आमच्यासाठी काळजी करणाऱ्या
बाबांना जागतिक फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…
हॅप्पी फादर्स डे!

तुम्ही दिलेला वेळ, तुम्ही घेतलेली काळजी आणि
तुम्ही दिलेले प्रेम
याची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही बाबा
– Happy Fathers Day

आपल्या कुटुंबाला नेहमी एकत्र ठेवणारा
आणि जपणारा असा माणूस म्हणजे बाबा…
Happy Fathers Day

आयुष्यात जोडीदार म्हणून कदाचित राजपुत्र सापडेल,
पण संपूर्ण साम्राज्य लुटविणारा पिता मिळणं कठीणच
Happy Fathers Day

अमेरिकेत फादर्स डे साजरा करण्यास सुरुवात झाली. फादर्स डे पहिल्यांदा यूएसए मध्ये सोनोरा स्मार्ट डॉडने प्रस्तावित केला होता. 1909 मध्ये, सोनोरा स्मार्ट डॉड या अमेरिकन मुलीने वडिलांचा सन्मान करण्याची कल्पना मांडली. अनेक स्थानिक पाळकांनी ही कल्पना स्वीकारली आणि 19 जून 1910 रोजी सोनोरा स्मार्ट डॉड यांनी वॉशिंग्टनमधील स्पोकेन येथे पहिला फादर्स डे साजरा केला.