Father's Day Special Song : प्रत्येकाच्या आयुष्यातील एक प्रभावी व्यक्तीमत्त्व म्हणजे वडील, त्यांच्या प्रति आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक वर्षांपासून फादर्स डे (Father's Day) वेगवेगळ्या अंदाजात साजरा केला जातो. त्याच्यासाठी खास भारतात 18 जूनला फादर्स डे साजरा केला जातो, वेगवेगळे गिफ्ट आणि शुभेच्छा देऊन फादर्स डे साजरा केला जातो. खर तर फादर्स डे साजरा करण्याची मुळ कल्पना ही अमेरिकेतून आली, सन 18 जून 1909 यादिवसा पासून फादर्स डे साजरा करण्याला सुरूवात करण्यात आली. फादर्स डे निमित्त तुमच्यासाठी बॉलिबूड गाण्याची यादी तयार केली आहे. ह्या गाण्याने नक्कीच तुम्हाला आपल्या वडिलां प्रति प्रेम, भावना, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते, सोशल मीडीयावर देखील ह्या गाण्याचा प्रभाव पडेल,
त्याचबरोबर फादर्स डे निमित्त त्यांच्यासाठी खास गीफ्ट देण्याची तयारी करा
फादर्स डे स्पेशल बॉलिवूड गाणी
कयामत से कयामत तक या चित्रपटातील सुप्रसिध्द गाणं, पापा कहते है -हे गाणं ऐकताच आपल्या वडीलांचा हसरा चेहरा नक्कीच सर्वांना आठवतो, संगीतकार उदीत नारायण यांनी गायलेले एवरग्रीन गाणं आहे.
https://youtu.be/FEvBiayarlc
मैं ऐसा ही हूँ या चित्रपटातील पापा मेरे पापा हे ह्रदयस्पर्सी गाणं सोनी निगम आणि श्रेया घोषाल ह्यांनी गायलेल आहे, ह्या गाण्यातून आपल्या वडिलां प्रति आदर आणखी वाढतो,
https://youtu.be/bhRswBsogNw
एक फुल दो माली ह्या चित्रपटातील तुझे सुरज कहू या चंदा या गाण्याने आपल्या वडीलांचे निस्वार्थी प्रेम दर्शवते, हे गाणं जूनं जरी असले तरी त्या गाण्यांचा प्रभाव अजूनही आपल्यावर पडतोय,
https://youtu.be/cN6goDD0jM4
अकेले हम अकेले तुम ह्या चित्रपटातून आमिर खान ह्यांनी बाबांची भुमिका पार पाडली आहे, ह्या चित्रपटातील तु मेरी जान तु मेरा दिल ह्या गाण्यातून बाबांची संवेदनशील भुमिका दिसते,
https://youtu.be/NQv9LoJPsH0
वडीलांसाठी हा फादर्स डे खास बनवण्यासाठी बाॅलीवूडची ही गाणे नक्कीच प्रभावशील ठरतील.