
Father’s Day 2023 Gift Ideas: एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात त्यांच्या वडिलांसारखा आदर्श कोणीच नसतो. वडील प्रत्येकाच्या आयुष्यात स्थिरता, धैर्य, दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम यांचे मॉडेल असतात. फादर्स डे जवळ आला आहे. फादर्स डे यंदा 18 जून म्हणजेच रविवारी जगभरात फादर्स डे साजरा केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता पासून वडिलांसाठी काय खास भेटवस्तू द्यावी याचा विचार करू शकता. जर तुम्हाला सुचत नसेल तर आम्ही काही खास भेटवस्तूंची यादी घेऊन आलो आहोत, यादी पाहून तुम्ही तुमच्या वडिलांना फादर्स डे निमित्त देऊ शकता. मदर्स डेनिमित्त सगळे जण आई साठी काही तरी करतात परंतु फादर्स डे कधी आहे याबद्दल अनेकांना माहिती नसते. चला तर मग यावर्षी प्रत्येक वडिलांचा दिवस अविस्मरणीय बनवूया... [Father’s Day 2023: कब है फादर्स डे? जानें इस दिवस का रोचक इतिहास तथा क्यों और कैसे मनाया जाता है यह दिवस?]
पाहा यादी:
टी शर्ट -
फादर्स डेच्या दिवशी तुम्ही वडिलांसाठी टी-शर्ट नक्कीच खरेदी करा. तुम्ही हा टी-शर्ट त्याच्या आवडत्या रंगातही विकत घेऊ शकता.
फुटवियर -
बहुतेक पुरुषांना फुटवियर खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या वडिलांना फुटवियर देऊ शकता. तसेच तुम्ही तुमच्या वडिलांना रनिंग शूज किंवा स्पोर्ट्स शूज गिफ्ट करू शकता. तसेच जर तुमचे वडील ऑफिसला जात असतील तर तुम्ही त्यांना फॉर्मल शूज किंवा स्लीपर देखील भेट देऊ शकता.
वेलनेस-ओरिएंटेड मसाजर
वेलनेस-ओरिएंटेड मसाजर हे वडीलांना देण्यासाठी हे एक चांगले गिफ्ट असेल.
या भेटवस्तूही देऊ शकता -
फादर्स डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या वडिलांना काही सुंदर रोपे गिफ्ट करू शकता. तसेच तुम्ही त्यांच्या आवडीचे स्वादिष्ट पदार्थ बनवून त्यांच्याबद्दल तुमचे प्रेम दाखवू शकता.
घड्याळ -
सध्या स्मार्ट घड्याळाचा ट्रेंड आहे, त्यामुळे तुम्ही त्यांनाही स्मार्ट घड्याळ देऊ शकता. भेटवस्तू म्हणून त्यांच्या आवडीनुसार त्यांना एक घड्याळ भेट द्या.
दरम्यान, भेटवस्तू देतांना महागाची भेटवस्तू द्यावी असे गरजेचे नाही. तुम्ही तुमच्या वडिलांना बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. त्यांचा सोबत वेळ घालवू शकता. तसेच यादीत दिलेल्या वस्तू व्यतिरिक्त त्यांना वेगळ काही आवडत असेल तर त्याचा विचार तुम्ही नक्की करू शकता.