
Happy Father’s Day 2020 HD Images: वडील म्हणजे एक अजब रसायन . फारसे न बोलणारे पण सर्वांच्या भावना ओळखून योग्य तो निर्णय घेणारे. सर्वांचे मन राखून निर्णय घेताना, तडजोडी करताना स्वत:ला होणारा त्रास, मनातील भावना मनातच ठेवणारे. घरातल्यांच्या उन्नतीत, यशात आपले यश मानणारे असे बाबा. आज 21 जून जो फादर्स डे (Father's Day) म्हणून साजरा केला जातो. पण, खरं तर असे कुठल्या विशिष्ट दिवशी शुभेच्छा दिल्याने कोणाच्याच वडिलांप्रती प्रेमाची भावना पूर्ण होऊ शकत नाही. परंतू, तरीही केवळ एक सोशल मीडियावरची टूम म्हणून हा दिवस साजरा केला जातो. खरे तर वडिलांना शुभेच्छा देण्याची काय गरज. प्रेमच इतकं भरभरुन केलं पाहिजे की शुभेच्छा द्यायचीच वेळ येता कामा नये. तरीही आपणास शुभेच्छा द्यायच्या असतील वडीलांप्रती प्रेम व्यक्त करायचे असेल तर इथले WhatsApp Stickers, Quotes, Messages, Wallpapers आणि Greetings इथे HD Images तुम्ही वापरु शकता.
फादर्स डे एचडी इमेज

एचडी इमेज- फादर्स डे

फादर्स डे शुभेच्छा

फादर्स डे शुभेच्छा

फादर्स डे शुभेच्छा

दरम्यान, यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी नागरिकांच्या हालचालिंवरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे वडिलांसाठी विशेष काही गिफ्ट घेण्यासाठी बाजारात जाताना काळजी घ्या. अधिक तर घरी थांबून वडिलांसोबतच फादर्स डे साजरा करणे उत्तम.