Dasara and Vijayadashami Images and Wishes in Marathi: अश्विन शुक्ल दशमी म्हणजेच विजयादशमी (Vijayadashami). आज (8 ऑक्टोबर) दिवशी भारताच्या विविध प्रांतामध्ये विजयादशमी आणि दसर्याचा सण साजरा केला जात आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या आजच्या दसर्याच्या दिवशी सरस्वती पूजन, सीम्मोलंघन करण्याची प्रथा आहे. अधर्माने धर्मावर विजय मिळून नवी सुरूवात करा असं सांगणारा आजचा दिवस तुम्ही देखील तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत साजरा करणार असाल तर दसरा आणि विजया दशमीच्या शुभेच्छा फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून HD Images, Wallpaper च्या माध्यमातून शेअर करून त्याची सुरूवात करू शकता. विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास WhatsApp Stickers देखील उपलब्ध आहेत. यंदा विजयादशमी आणि दसर्याच्या शुभेच्छा देण्यासाठी ही खास मराठमोळी ग्रीटिंग्स शेअर करून आनंद द्विगुणित करायला विसरू नका. Dussehra 2019 Date: यंदा दसरा, विजयादशमी कधी साजरी केली जाणार? पहा पूजा विधीचे शुभ मुहूर्त
दसरा आणि विजया दशमीच्या शुभेच्छा
शुभ दसरा
दसर्याच्या शुभेच्छा
विजयादशमीच्या शुभेच्छा
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा
दसरा व विजयादशमीच्या शुभेच्छा
दसरा आणि विजया दशमी शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Stickers कसे डाऊनलोड कराल?
आजकाल जगभरात व्हॉट्सअॅप हे मेसेजिंग अॅप प्रामुख्याने वापरलं जाते. व्हॉट्सअॅपने वर्षभरापूर्वी व्हॉट्सअॅप स्टिकर्स हा नवा पर्याय युजर्सना दिला आहे. इंग्रजी प्रमाणेच भारतीय भाषांमध्येही व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून तुम्ही दसरा आणि विजयादशमीच्या शुभेच्छा देऊ शकता. गूगल प्ले स्टोअरवर दसर्याच्या शुभेच्छा देण्यासाठी खास व्हॉट्सअॅप स्टिकर्स येथे उपलब्ध आहेत. नक्की वाचा: Dussehra 2019: दसरा दिवशी आपट्याची पानं 'सोन्याच्या' स्वरूपात का वाटतात?
दसर्याच्या शुभेच्छा देण्यासाठी खास व्हिडीओ
उत्तर भारतामध्ये आज दसरा आणि विजया दशमीचा सण रामलीला सादर करून साजरा केला जातो. यामध्ये रावणाचा पुतळा उभारून त्याचे दहन केले जाते. या दहनामागे समाजातील आणि तुमच्या आमच्या मनातील वाईट विचार, सवयी यांचा नाश व्हावा अशी अपेक्षा असते. मग यंदा तुम्ही कोणत्या वाईट सवयींचा त्याग करून नवी सुरूवात करणार आहात? हे आम्हांला नक्की सांगा. लेटेस्टलीच्या वाचकांना दसरा आणि विजयादशमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!