Dussehra 2019 Date: यंदा दसरा, विजयादशमी कधी साजरी केली जाणार? पहा पूजा विधीचे शुभ मुहूर्त
Dussehra (Photo Credits: File Photo)

Dussehra 2019 Date and Importance:  अश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी (Vijaya Dashami)  म्हणजेच दसरा (Dussehra) सणाचा. यंदा दसरा 8 ऑक्टोबर दिवशी देशभरात साजरा केला जाणार आहे. घटस्थापनेदिवशी घटाची स्थापना करून पुढील नऊ दिवस नवरात्र (Navratri) साजरी केली जाते. त्यानंतर दहाव्या दिवशी विजया दशमी म्हणजे दसरा साजरा केला जातो. ज्ञानाची देवता असलेल्या सरस्वतीचं पूजन दसर्‍या दिवशी केले जाते. तर महाराष्ट्रात दसर्‍याला आपट्याची पानं वाटली जातात. दसराा हा सण विजयाचा, पराक्रमाचा असल्याने तो आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो. तसेच दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने तो विशेष आहे. Dry Day In October 2019: महात्मा गांधी जयंती, दसरा, विधानसभा निवडणूक, दिवाळीच्या निमित्ताने राज्यात 8 दिवस पाळला जाणार ड्राय डे, पहा संपूर्ण यादी

दसरा तिथी आणि मुहूर्त

दसरा तारीख - मंगळवार, 8 ऑक्टोबर

विजयादशमी तिथी - 7 ऑक्टोबरला 12.39 पासून दशमी सुरू होईल ते 8 ऑक्टोबर दिवशी दुपारी 14:50 पर्यंत असेल.

विजया दशमी हा सीम्मोलंघनाचा दिवस आहे. यादिवशी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जाण्याची प्रथा आहे. तसेच शमी किंवा आपट्याचे पूजन केले जाते. अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करून पूजा करण्याचीही प्रथा आहे. दसरा हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक दिवस असल्याने या दिवशी शुभ कार्याची सुरूवात केली जाते. सोने खरेदीकडेदेखील अनेकांचा कल असतो.

पौराणिक कथेनुसार दसरा या सणादिवशी अधर्मावर धर्माने ताबा मिळवला. रामाने विजयादशमी दिवशीच रावणाचा वध केला. पांडवांचा अज्ञातवास देखील विजया दशमी दिवशी संपल्याने हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये विविध प्रांतात दसरा आणि विजयादशमीचा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.