Dry Day In October 2019: महात्मा गांधी जयंती, दसरा, विधानसभा निवडणूक, दिवाळीच्या निमित्ताने राज्यात 8 दिवस पाळला जाणार ड्राय डे, पहा संपूर्ण यादी
Alcohol | Representative Image (Photo Credit: Wikimedia Commons)

यंदा महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections) व लागोपाठ येणाऱ्या सणांमुळे ऑक्टोबर महिन्यात पूर्ण आठ दिवस तळीरामांची गैरसोय होणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक सह संपूर्ण राज्यात या आठ दिवशी ड्राय डे पाळण्यात येणार आहे. या दिवशी विदेशी मद्य, देशी दारू पासून ताडी ची दुकाने देखील बंद राहणार आहेत. उद्या 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जंयती (Mahatma Gandhi Jayanti) निमित्त आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या आठवड्यात 8 ऑक्टोबर रोजी दसरा (Dasara)  आणि 13 ऑक्टोबरला वाल्मिकी जयंती (Valmiki Jayanti) असल्याने ड्राय डे असणार आहे.

येत्या दिवसात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे सत्र देखील पार पडणार आहे. या अंतर्गत 21 ऑक्टोबरला मतदान व 24 ऑक्टोबर लामतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीची ही संपूर्ण प्रक्रिया शिस्तपूर्ण रीत्या पार पडावी याकरिता राज्य निवडणूक आयोगातर्फे या दोन्ही दिवशी तसेच मतदानाच्या त्यापूर्वी 48 तास आधीपासूनच मद्यविक्रीस मनाई करण्यात येणार आहे. यानुसार शनिवार 19 ऑक्टोबर, रविवार 20 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी राज्यात दारूविक्री होणार नाही.

पहा ट्विट

विधानसभेनंतर येणाऱ्या रविवारी म्हणजेच 27 ऑक्टोबर पासून दिवाळी सुरु होत आहे. यानिमित्त नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजन असल्याने ड्राय डे असणार आहे.

ऑक्टोबर महिन्यातील या आठ दिवसात मद्यपींची गोची होणार असली तरी नोव्हेंबर महिन्यात केवळ दोनच दिवस ड्राय डे असल्याने याची कसार भरून काढता येणार आहे.