Happy Diwali Marathi Greetings 2023: दिवाळी सणाचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व दिले जाते. हा सण दसऱ्याच्या नंतर साजरा केला जातो. हिंदी कॅलेंडर नुसार दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरी केली जातो. या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते. मानवी श्रध्देनुसार या दिवशी घरातल्या लक्ष्मीचे पूजन केले जाते. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन संपत्तीचा आशिर्वाद देते. हिंदू ग्रंथानुसार याच दिवशी श्रीराम रावणाचा वध चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते. त्यावेळी अयोध्या दिव्यांनी सजवली होती आणि रामाचे अयोध्येत स्वागत केले होते. त्यामुळे दिवाळी हा सण भारतात मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. तेव्हापासून भारतात लोक घरा घरात दिवे लावून सजवतात.
अंहकारचा वध करून प्रत्येकाच्या घरात दिव्यांसारखा लखलख प्रकाश व्हावा या आशेने घरात दिवे लावले जातात. या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्ती नवीन कपडे घालून दिवाळी साजरी करत असतो. दिवाळीत आपल्या प्रियजणांना शुभ दिवसाच्या Images, Wishes, SMS, WhatsApp Status च्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता, यासाठी खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
-
आयुष्याच्या अंगणी लावा करुणेचा दिवा सुख-समाधानाची होवो उधळण मायेच्या उटणे न्हाऊनी साजरा करू दिवाळी
2. दिव्यांसारखी तेजस्वी आणि रांगोळी सारखी रंगीबेरंगी आयुष्याचे क्षण असावे, दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा
3. उटणं, अभ्यंग तेलाला आज चंदनाचा सुवास दारोदारी दिव्यांची आरास ताटात लाडू-चकल्या अन फराळाचा बेत खास स्वागत करू तेजस्वी पर्वाचे झाली दिवाळी पहाट दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
4. दिव्यांची उजळण तुमच्या आयुष्यात समृध्दी आणि ऐश्वर्य आणेल दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळीची सुरुवात ही वसु बारसच्या सणापासून सुरु होते. भारतात ठिकठिकाणी गाय आणि बासरूची पूजा केली जाते. फक्त पूजाच नव्हे तर त्याची सेवा करत त्याची कृतज्ञता मानली जाते. गाईला हिंदू धर्मात देवीची रुप मानले जाते. तर बळीराजा या दिवसात गाईची पूजा करतो. गाय ही विष्णू देवाचे वाहन मानले जाते.