Diwali 2023 Invitation Cards in Marathi: दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्ट, मित्रमंडळींना WhatsApp Messages, SMS द्वारा फराळाचं आमंत्रण देण्यासाठी खास मराठमोळे नमुने
Diwali | File Image

दिवाळी (Diwali) सणाची आबालवृद्धांना वर्षभर उत्सुकता असते. दिव्यांच्या झगमगाट, रंगांची उधळण करणारा हा सण वसूबारस (Vasu Baras) ते भाऊबीज (Bhau Beej) पर्यंत 5-6 दिवस चालतो. प्रत्येक दिवसाची मज्जा काही औरच असते. यंदा 12 नोव्हेंबरला दिवाळीची पहिली आंघोळ होणार असून तेव्हापासून महाराष्ट्रात दिवाळीची धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे. दिवाळी निमित्ताने आप्तेष्ट, नातेवाईकांकडे फराळ, भेटवस्तू घेऊन जाण्यासाठी लगबग असते. मग या निमित्ताने तुमच्या प्रियजणांसोबतच एक संध्याकाळ साजरी करायची असल्यास त्यांना आमंत्रणही खास अंदाजामध्ये देऊन त्यांच्यासाठी दिवाळी स्पेशल करा. Instagram Messages, WhatsApp, Facebook Messages द्वारा तुम्ही ही आमंत्रणं शेअर करून त्यांना घरी बोलावू शकता. मग पहा यंदाच्या दिवाळी आमंत्रणाचे मराठमोळे काही खास नमुने!

दिवाळी आमंत्रण नमुने -

Diwali | File Images

शुभ दीपावली !

आपल्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करण्यासाठी साजरी करू दिवाळी

फराळ, गप्पा,गाण्यांसह, भेटीगाठी आणि गेम्स खेळण्यासाठी भेटू सोमवार, 13 नोव्हेंबरच्या संध्याकाळी!

पत्ता-

---------------

चिवडा-चकली, लाडू-करंजीची लज्जत चाखण्यासाठी

आमच्या आनंदात तुमच्या उपस्थितीने आणखीन भर टाकण्यासाठी

यंदा 15 नोव्हेंबर दिवशी सायंकाळी 7 पासून आपल्या कुटुंबासमवेत

आमच्या घरी नक्की भेट द्या!

पत्ता:

---------------------

दिवाळीचा दिवा वातावरण करतो मंगलमय

अन तुमच्या संगतीने आमचं आयुष्य होवो तेजोमय!

दीपावली निमित्त फराळाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या घरी नक्की या

आग्रहाचं निमंत्रण!

--------------------

ग्रामीण महाराष्ट्रात वसूबारसेला घरातील गोधनाची पूजा करून दिवाळी सणाची सुरूवात केली जाते. त्यानंतर धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज अशी सणांची रेलचेल असते. दिवाळीच्या निमित्ताने घरातील सारी मंडळी हमखास वेळ काढून एकत्र जमतात. एरवी चकली, लाडू खात असले तरीही दिवाळी घरी बनणार्‍या दिवाळी स्पेशल फराळावर ताव मारतात.