
Diwali 2019 Marathi Greetings: भारत देशाची ओळख सांगायची झाल्यास आपल्याकडील सण उत्सवांचा उल्लेख झाल्यावाचून राहणार नाही. किंबहुना म्ह्णूनच भारताला सेलिब्रेशन लँड असेही संबोधले जाते. आज, 27 ऑक्टोबर पासून सुद्धा देशात दिवाळीच्या (Diwali 2019) रूपात एका नव्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. सर्वधर्मियांसाठी दिवाळीच्या सणाचे खास महत्व आहे. दिव्यांची रोषणाई, रांगोळीची सजावट, फराळाची लज्जत आणि एकूणच धमालमस्ती या साऱ्याची सांगड घालत आपल्याकडे दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या निमित्ताने नातलग मंडळी, मित्रपरिवार आणि कुटुंबियांसोबत अनेकांकडे छोट्या पार्टीचे आयोजन केले जाते, पण जर का यंदा तुम्हाला तुमच्या व्यस्थ शेड्युल मुळे या पार्टी किंवा गेट टू गेदरला उपस्थित राहणे शक्य होणार नसेल तरी तुम्ही तुमच्या शुभेच्छा आपल्या जवळच्या मंडळींना पाठवू शकता. डिजिटल शुभेच्छांच्या या काळात भल्या मोठ्या मॅसेज ऐवजी अगदी मोजक्या शब्दात दिवाळी आणि नरकचतुर्दशीच्या शुभेच्छा या काही HD Images, Greetings तुम्ही Whatsapp, Facebook, Instagram वरून नक्की शेअर करा..
दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छापत्र






दरम्यान, दिवाळी 25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत साजरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा वसुबारस या दिनाच्या तिथीवर दिवाळीची सुरुवात झाली याच दिवशी धनत्रयोदशीचा योग देखील जुळून आला होता. तर आज सुद्द्धा नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त एकत्र आला आहे. आजच्या या पावन दिवशी माता लक्ष्मीचे पूजन करून सुख समृद्धी, धनसंपदा आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते.