Happy New Year and Diwali Wishes: दिवाळीचा सण हा दक्षिण भारतातील काही लोकांसाठी नववर्षाची देखील सुरूवात घेऊन येते. भारतामध्ये दिवाळीचा सण म्हणजे रोषणाईचा झगमगाट आणि गोडाधोडाची रेलचेल असते. वसू बारस, धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन ( Laxmi Pujan) नंतर दिवाळी पाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची पद्धत आहे. लक्ष्मी पुजनाला माता लक्ष्मी आणि गणेशपुजा केल्यानंतर दिवाळी पाडव्या नव्या वर्षाची सुरूवात होते. महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये विक्रम संवत्सराची ( Vikram Samvat) सुरुवात कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजे दिवाळीतल्या पाडव्याच्या (Diwali Padwa)दिवशी होते. मग या नव्या वर्षाची सुरूवात तुमच्या परिवारासारासह प्रियजनांना मंगलमय, आनंददायी जावो ही सदिच्छा देण्यासाठी दिवाळी व नववर्षाच्या शुभेच्छा देणारी ही काही ग्रिटिंग्स, शुभेच्छापत्र, मेसेजेस व्हॉट्सअॅप, फेसबूक द्वारा नक्की शेअर करा.
यंदा दिवाळी पाडवा 16 नोव्हेंबर दिवशी साजरा केला जाणार आहे. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने एक नवी सुरूवात करा. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे त्यामुळे या दिवसाचा आनंद तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.
शुभ दीपावली आणि नववर्षाच्या शुभेच्छा!
व्यापारी वर्ग देखील दिवाळीमध्ये लक्ष्मी पुजन पार पडल्यानंतर दिवाळी पाडव्याच्या दिवसापासून नव्या वर्षाची सुरूवात करतात. महाराष्ट्र-गुजरात मध्ये पंचांगाप्रमाणे, नवीन विक्रम संवत्सराची सुरुवात ही कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून होत असल्याने त्या दिवसापासून 31 डिसेंबरपर्यंत विक्रम संवत्सराचा अनुक्रमांक हा इंग्रजी वर्षक्रमांकापेक्षा 57 दिवासांनी पुढे असतो. 1 जानेवारीपासून ते आश्विन अमावास्येपर्यंत हा फरक 56 दिवसांचा असतो.
आता व्हॉट्सअॅपवरही तुम्ही नववर्षाच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास व्हॉट्सअॅप स्टिकर्सचा पॅक डाऊनलोड करून शुभेच्छा देऊ शकता. हा आनंद द्विगुणित करणारा सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी घेऊन येणारा ठरो हीच आमची कामना.