
दिवाळी (Diwali) सणाची उत्सुकता सार्यांमध्येच असते. हिंदू बांधवांच्या या सर्वात मोठ्या आनंदाच्या पर्वामध्ये सहभागी होताना आपोआपच रंगांची उधळण होते, दिव्यांची आरास केली जाते, रोषणाई मुळे सारीकडेच झगमगाट असतो. मग अशा या आनंदाच्या आणि मंगलमय पर्वाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांसोबत आप्तेष्टांनाही देण्यासाठी खास मराठामोळी ग्रीटिंग्स शेअर करू शकता. WhatsApp Status, Facebook Messages, Instagram Messages, Wishes, Images शेअर करून या आनंदाला द्विगुणित करायला विसरू नका.
दिवाळीची सुरूवात 9 नोव्हेंबरला वसूबारसच्या सणाने होणार आहे. त्यानंतर दिवाळीमधील धनतेरस, नरक चतुर्दशी अर्थात पहिली आंघोळ, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज हे सण साजरे केले जातील. यानिमित्त नवीन कपड्यांची खरेदी केली जाते. दिवाळीच्या दिवसात संध्याकाळी दारात दिवे लावून रांगोळी काढून आकर्षक सजावट केली जाते. Diwali 2023 Invitation Cards in Marathi: दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्ट, मित्रमंडळींना WhatsApp Messages, SMS द्वारा फराळाचं आमंत्रण देण्यासाठी खास मराठमोळे नमुने .
दिवाळीच्या शुभेच्छा

अंधार दूर झाला रात्रीसोबत,
नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन,
डोळे उघडा एक मेसेज आला आहे,
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन
शुभ दीपावली

झगमग-झगमग दिवे लागले,
दारोदारी आली दिवाळी,
दीपावली सणाच्या या शुभ दिवशी
तुम्हाला लाभो सुख, समृद्धी, शांती
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

आनंद होऊ दे ओव्हरफ्लो,
मस्ती नको होऊ दे स्लो,
धन आणि आरोग्याची होऊ दे बरसात,
असा होवो तुमचा दिवाळीचा सण खास
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

दीप जळत राहो
तुमचं घर प्रकाशमान राहो,
या दिवाळीच्या सणाला
तुम्हाला सर्व सुख मिळो!
शुभ दीपावली

दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कार,
आनंदाचा होवो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे शुभेच्छा
यश आणि आनंद मिळो सर्वांना
शुभ दीपावली
सध्या मुंबई सह देशातील प्रमुख शहरांमध्ये वाढतं प्रदुषण पाहता फटाके उडवणं टाळण्यामध्येच सार्यांचे हित आहे. पूर्वी पहाटे सूर्योदयापूर्वी पहिल्या आंघोळीच्या आधी फटाके फोडले जात असे. पण आता हळूहळू त्याचं प्रमाण कमी होत आहे. काही ठिकाणी ग्रीन क्रॅकर्स उडवण्याचा सल्ला दिला जातो.