Shubh Deepavali Wishes In Marathi: दिवाळी (Diwali) हा हिंदू धर्मीयांसाठी सर्वात मोठा सण आहे. दिवाळीच्या सणाची खरी सुरूवात वसूबारस (Vasubaras) पासून होते आणि सांगता भाऊबीजेच्या (Bhaubeej) दिवशी होते. यंदा वसूबारस 21 ऑक्टोबर दिवशी त्यानंतर 22 ऑक्टोबरला धनतेरस, 24 ऑक्टोबरला नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन तर 26 ऑक्टोबरला दिवाळी पाडवा आणि भाऊबीज असे सण साजरे केले जाणार आहेत. मग कोरोनाचं संकट दूर सारून यंदा पुन्हा 2 वर्षांनी दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी सज्ज होताना तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना या सणामध्ये सहभागी करून घेत त्यांनाही 'शुभ दीपावली' म्हणत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ही मराठमोळी शुभेच्छापत्रं, ग्रीटिंग्स, Wishes, HD Images, WhatsApp Status शेअर करत डिजिटली या सणाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका. नक्की वाचा: Happy Diwali 2022 Advance Messages: दिवाळी निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, SMS, Images च्या माध्यमातून मित्र-परिवारास द्या खास शुभेच्छा!
दिवाळी सणानिमित्त घरात गोडा-धोडाचे पदार्थ बनवले जातात. पारंपारिक फराळाचे पदार्थ बनवण्याची देखील रीत आहे. आजकाल चकली, चिवडा सर्रास बाराही महिने सहज उपलब्ध असल्याने त्याची क्रेझ थोडी कमी झाली आहे. पण दिवाळीच्या निमित्ताने घरात रोषणाई केली जाते. दिव्यांची आरास केली जाते यामुळे वातावरण चैतन्यमय होतं.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
यशाची रोषणाई
कीर्तीचे अभ्यंग स्नान
मनाचे लक्ष्मिपुजन
समृद्धीचा फराळ
प्रेमाची भाऊबीज
अशा मंगल दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा!
दिवाळी सणाच्या तुम्हांला मनापासून शुभेच्छा
हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यातील अंधकार, दु:ख
दूर सारून नवी प्रकाशवाट दाखवू हीच सदिच्छा!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
शुभ दीपावली!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन जाऊ दे निशा
घेऊन येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
शुभ दीपावली
भारतात सर्वत्र हिंदू धर्मीय दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात. दिवाळीच्या 4-5 दिवसात पशूधनापासून सोनं, चांदी सारख्या मौल्यवान धातूंची पूजा केली जाते. या सणामध्ये अनेकजण मोठी खरेदी देखील करतात. नवे कपडे, गॅजेट्स ते सोनं, चांदी खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. दिवाळीत अनेकजण नातेवाईकांना, मित्रमंडळींना हमखास भेटायला जातात. सोबत मिठाईची देवाण-घेवाण करण्याची देखील रीत आहे. यामुळे दिवाळीचे दिवस चैतन्यमय वातावरणात जातात.