Happy Chocolate Day 2022 Wishes In Marathi: चॉकलेट डे च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत गोड करा आजचा दिवस!
Chocolate Day HD Images | File Image

फेब्रुवारी महिना आला की प्रेमी युगुलांना व्हॅलेंटाईन डेजचे वेध लागण्यास सुरूवात होते. दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे जरी साजरा केला जात असला तरीही त्याच्या आठवडा आधी रोज एक वेगवेगळा दिवस साजरा करण्याची पद्धत आहे. व्हॅलेंटाईन वीक मधला तिसरा दिवस हा चॉकलेट डे (Chocolate Day) म्हणून साजरा केला जातो. 9 फेब्रुवारीला दरवर्षी चॉकलेट डे साजरा करत प्रेमी युगुल त्यांच्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीसोबत या दिवसाचा आनंद द्विगुणित करतात. आजकाल चॉकलेट्समध्येही अनेक प्रकार आणि चवी उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येकाची चॉकलेट खाऊन हा दिवस साजरा करण्याची पद्धत वेगळी असेल पण तुमच्या आयुष्यातील त्या खास व्यक्तीला सकाळी चॉकलेट डे च्या शुभेच्छा सोशल मीडीयामध्ये WhatsApp Messages, Wishes, GIFs, Greetings, HD Images द्वारा देत दिवसाची सुरूवात खास करण्याचा प्लॅन करत असाल तर लेटेस्टली च्या टीम कडून तयार करण्यात आलेली ही ग्रीटिंग्स तुम्ही नक्की वापरू शकता.

व्हॅलेंटाईन वीक मध्ये चॉकलेट डे नंतर 10 फेब्रुवारीला टेडी डे, 11 फेब्रुवारीला प्रॉमिस डे, 12 फेब्रुवारीला हग डे,13 फेब्रुवारीला किस डे आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची पद्धत आहे. हे देखील नक्की वाचा: Valentine Week and Anti-Valentine 2022 Week Full List: व्हॅलेंटाईन डे पासून ब्रेक-अप डे पर्यंत 'या' महत्त्वाच्या तारखांची यादी ठेवा लक्षात! 

चॉकलेट डे 2022 शुभेच्छा

चॉकलेट डे File Image

via GIPHY

मला हाक न मारता मी तुझ्या समोर येईन,

वचन दे असे की मैत्री तु सुद्धा निभावशील,

परंतु असे नाही फक्त रोज आठवण काढशील,

फक्त लक्षात ठेव जेव्हा तु एकट्यात Dairmailk खाशील

Happy Chocolate Day!

चॉकलेट डे File Image

via GIPHY

असे वाटते एका स्वप्नासारखी संध्याकाळ आली,

पाहिले तर तु निखळ हसत होतीस,

ज्यात तू एका चॉकलेटसारखी गोड वाटत होतीस,

या वातावरणात गोड प्रेमाचे गाणे गुणगुणत होतीस

Happy Chocolate Day!

चॉकलेट डे File Image

‘Kit-Kat’ चा स्वाद आहेस तू..

‘Dairy Milk’ सारखी स्वीट आहेस तू..

‘Cadbury’ पेक्षाही खास आहेस तू..

काहीही असो माझ्यासाठी,

‘Five Star’ आहेस तू…

Happy Chocolate Day

दरम्यान चॉकलेट आवडत नाही अशा व्यक्ती जरा कमीच असतील कोणत्या ना कोणत्या प्रकारातील चॉकलेट हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. काहींसाठी छोट्या मोठ्या ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी चॉकलेट मदत करते. काहीजण रूसवे-फुगवे दूर करण्यासाठी चॉकलेटची मदत घेतात अनेकांसाठी आनंद, सेलिब्रेशनचा सोबती हा चॉकलेट असतो. मग तुम्ही देखील व्हॅलेंटाईन वीक मधील आजचा हा चॉकलेट डे कसा आणि कोणत्या चॉकलेट सोबत साजरा करताय ते आमच्या सोबतही शेअर करा आणि या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.