Chand Raat Mubarak 2020 Wishes and Messages: भारतामध्ये आक केरळ, कर्नाटक, जम्मु कश्मिरमध्ये ईदचा सण साजरा झाला. ईद उल-फ़ित्र (Eid-ul-Fitr) या सणाने पाक महिना रमजानची सांगता होते. आज भारतामध्ये इस्लामधर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्याची शेवटची रात्र आहे. आजच्या चंद्र दर्शनानंतर रमजान महिन्याला अलविदा म्हणत शव्वाल महिन्याचं स्वागत केलं जातं. मग मुस्लिमांमध्ये विशेष आकर्षण आलेल्या या रमजान ईदच्या पूर्वी चांद रातच्या शुभेच्छा (Chand Raat Mubarak) देऊन आगामी नव्या महिन्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात. भारतामध्ये उद्या म्हणजेच 25 मे दिवशी रमजान ईदचा (Ramzan Eid) आनंद साजरा केला जाणार आहे. इस्लामिक धर्मियांचे कॅलेंडर हे चंद्र दर्शनावर अवलंबून असतं. त्यामुळे जगभरात चंद्रदर्शनानुसार रमजान ईदची तारीख बदलते. उद्या मोठ्या उत्साहात रमजान ईद म्हणजेच ईद उल-फ़ित्रचा सोहळा सेलिब्रेट करणार आहेत. आकाशात शव्वाल महिन्याची चंद्रकोर दिसली की मुस्लिम बांधव आनंदाने एकमेकांची गळाभेट घेऊन चांदरातच्या शुभेच्छा (Chand Raat Shubhechha) देतात. मग तुमच्या आयुष्यातही चंद्रकोरी प्रमाणे मोहक, नाजूक आणि प्रिय व्यक्तींना आजच्या चांद रातच्या शुभेच्छा (Chand Raat Wishes) देऊन त्यांचा यंदाचा रमजान ईदचा आनंद द्विगुणित करू शकता. कोरोना व्हायरस संकटामुळे तुम्ही यंदा तुमच्या सार्याच प्रियजनांना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना भेटू शकणार नाही. पण हा दिवस साजरा करताना सोशल मीडियात इंस्टाग्राम, फेसबूक,ट्विटर, फेसबूक मेसेंजर आणि स्टेटसच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन चांद रात मुबारक! म्हणत त्यांच्या चेहर्यावर एक स्मितहास्य तर नक्कीच आणू शकता. Eid Mubarak 2020 Wishes: रमजान ईद च्या शुभेच्छा मराठी Messages, GIF Images, WhatsApp Stickers, Facebook Greetings च्या माध्यमातून शेअर करून 'ईद उल फितर' चा सण करा स्पेशल!
जगभरात चांद रात आणि रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधव कोरोना व्हायरस संकटामध्येही ईद उल-फ़ित्रची तयारी करत आहेत. मग हा आनंद डिजिटल मीडियामधून थोडा द्विगुणित करण्यासाठी ही शुभेच्छापत्र तुम्ही नक्कीच शेअर करू शकता. Chand Raat Mubarak 2020 Greetings: चांद रात मुबारकच्या शुभेच्छा Wishes, Messages, Greetings, GIF Images, HD Wallpapers च्या शेअर करून खास करा तुमच्या मुस्लिम मित्र- मैत्रिणींचा यंदाचा ईदचा सण.
चांद रात मुबारक हो!
रमजान हा इस्लामिक कॅलेंडरमधील 9 वा आणि अत्यंत पवित्र महिना समजला जातो. या महिन्याच्या निमित्ताने अल्लाह जन्नतचे दरवाजे उघडतो. त्याची मनापासून प्रार्थना करणार्या प्रत्येक भाविकाची दुआ कबुल करतो. अशी धारणा आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव 30 दिवस रोजा ठेवतात. यामध्ये त्यांना सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काहीही खाण्याची-पिण्याची परवानगी नसते. 30 दिवसांच्या या कडक उपवासांनंतर मुस्लिम बांधव रमजान ईद दिवशी मोठ्या उत्साहाने एकत्र येऊन सण साजरा करतात.