
Happy Bhaubeej 2024 Wishes In Marathi: भाऊबीज (Bhaubeej 2024) हा भाऊ-बहिणीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. याला यम द्वितीया असेही म्हणतात. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो, तिथे बहीण त्यांला टिळक लावते आणि त्याचे औक्षण करते. या दिवशी भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या आयुष्यासाठी प्रार्थना करते. यामुळे भावाला अकाली मृत्यूपासून मुक्ती मिळते. यावेळी भाऊबीजेचे दोन शुभ योगही तयार होत आहेत.
द्रिक पंचांगानुसार यावर्षी कार्तिक मासातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी शनिवार, 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8.21 पासून सुरू होत आहे. ही तारीख रविवार, 3 नोव्हेंबर रोजी रात्री 10:05 वाजता संपेल. भाई दूज म्हणजेच यम द्वितीया हा उत्सव उदयतिथीच्या आधारे साजरा केला जाईल. भाऊबीजेनिमित्त तुम्ही आपल्या भावाला Images, Wishes, Greetings द्वारे खास मराठी शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
आठवण येते बालपणीची,
तुझी गोड हाक तुझी सदैव असणारी सोबत,
तुझा आशिर्वाद सदैव साथ आहे,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे
वेड्या बहीणीची वेडीही माया….
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!

भाऊबीजेचा आला सण,
बहिणीची प्रार्थना भावाचं प्रेम,
बहीण-भावाचं नातं असंच राहो,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.

नशीबवान असते ती बहीण,
जिच्या डोक्यावर असतो भावाचा हात,
प्रत्येक संकटात असते त्याची साथ,
भाऊबीजेच्या मन:पूर्वक शुभेच्छा

भाऊबीजेचा सण आहे खूपच खास,
कारण असंच नाही होत कोणतंही नातं खास,
भाऊबीजेच्या शुभेच्छा.

भाऊबीजेच्या दिवशी भावाचे औक्षण करण्यासाठी शुभ मुहूर्त 2 तास 11 मिनिटे आहे. या काळात तुम्ही भावाला टिळक लावू शकता आणि त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करू शकता.